आपलं नशीब खरंच आपल्या हातात आहे का।
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपलं नशीब खरंच आपल्या हातात आहे का। आपलं नशीब आपण स्वतच्या हातात घेऊ शकतो का, तसं करता येत असेल तर त्याचा मार्ग काय, या आणि अशा बर्याच प्रश्नांचा सद्गुरू इथे आढावा घेतात। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, प्रत्येक व्यक्तिसाठी मग ती कोणी का असेना त्याचं जीवन महत्वाच आहे। त्याचं जीवन जर महत्वाचं आहे तर, अर्थातच त्याची सुख समृद्धी सुद्धा त्याच्यासाठी महत्वाची असणारच। लोक आपल्या आयुष्याचा खूप सारा वेळ सुख समृद्धी साधण्यामध्ये गुंतवतात। तुम्हाला असं दिसून येईल की, काही लोक इंजीनियर बनून आपली, उपजीविका कामावण्यासाठी आयुष्याचे पंचविस् वर्ष गुंतवतात। ते आपलं कुटुंब घडवण्यामद्धे आपल्या अर्ध्या आयुष्याची गुंतवणूक करतात। पण आपल्या आंतरिक सुख समृद्धीसाठी ते कितीसा वेळ देतात। आजकाल सर्वजण बाह्य परिस्थिती सुधारण्यात आणि तिचे, व्यवस्थापन करण्यात व्यस्त आहेत। बाह्य परिस्थितीमध्ये तुम्ही कितीही सुधारणा केली तरी...