नशीब आणि कर्म यांपैकी कोणावर विश्वास ठेवला पाहिजे।
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नशीब आणि कर्म यांपैकी कोणावर विश्वास ठेवला पाहिजे। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, एका जंगलाच्या दोन्ही बाजूला दोन वेगवेगळी राज्ये होती। दोन्ही राजा आपापल्या राज्यात सुखी होती। दोन्ही राज्यांच्या मध्ये एक संत राहायचे। दोन्हीही राजा त्यांना आपले गुरू मानत आणि त्यांचा खूप आदर ही करत। त्या जंगलाच्या मध्यातून, एक नदी वाहायची की जी दोन्ही राज्यांचे एकमेव पाण्याचे स्त्रोत होती। काही दिवसांनी त्या नदीवरून दोन्ही राज्यांत, मोठा वाद सुरू झाला ज्यांच रूपांतर युध्दात झालं। युद्धाची तयारी सुरू झाली। दोन्ही राजा एकेक करून आशीर्वाद घ्यायला त्या साधुंकडे आले। पहिला राजा आशीर्वाद घ्यायला आला असता साधूंनी आशीर्वाद दिला, आणि सांगितले की तुझ्या भाग्यात युद्ध जिंकण लिहलेले नाही पुढे ईश्वराची इच्छा,राजा निराश होऊन निघून गेला त्याने विचार केला हरायचच आहे तर पूर्ण ताकद लावून लढून हारुया। दुसरा राजा साधूंकडे आशीर्वाद घ्यायला आला असता साधूंनी आशीर्वाद दिला, आणि सांगितले की यावेळी भाग्य तुझ्या सोबत आहे, पुढे ईश्वराची इच्छा हे ऐकताच राजा आनंदाने नाचू लागला। त्याने सेनेलाही भाग्य आपल्या बाजूने असल्याचे सांगितले। युद्ध सुरू झाले। एकीकडे पहिला राजा पूर्ण ताकद लावून लढू लागला तर, दुसरीकडे आपणच जिंकणार या विश्वासात दुसरा राजा इतका निश्चिंत राहिला की, घोड्याची लगाम तुटल्याचे त्याच्या लक्षातच आलं नाही झालं घोडा खाली पडला, आणि दुसरा राजा शत्रूच्या हाती सापडला। युध्दात दुसऱ्या राजाला हार पत्करावी लागली। युद्ध समाप्तीनंतर संत रणांगणात आले, दोन्ही राजांना एकच प्रश्न पडला की नशिबात लिहलेले कस काय बदललं। साधू म्हणाले, नशीब कधीही बदलत नाही, बदललात ते तुम्ही पहिल्या राजाला माहीत होत की तो, हारणार आहे म्हणून त्याने प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन युद्धाची तयारी केली याउलट दुसऱ्या राजाने जिंकण्या आधीच जल्लोष सुरू केला। शेवटी तेच झालं, नशिब नाही बदलले तुम्ही तुमचं व्यक्तित्व बदलले नशिब हे लोहासारखं असतं। जिथं कर्माच चुंबक उपस्थित असेल तिथं ते आकर्षित होत। नेहमी चांगलं कर्म कराल तर नशीब तुमचंच आहे। पण जर नशिबावर अवलंबू राहून कर्म करीत नसाल तर फक्त दुख, आणि अपयश च मिळणारं। साक्षात श्री कृष्णाने महाभारतात अर्जुनाला सांगितल होत, की राज्य तुझ्या नशिबात आहे की, नाही हे नंतर कळेलच परंतु तुला युद्ध तर करावच लागेल। तुला तुझ कर्म तर करावच लागेल संत तुलसीदास त्यांच्या रामचरित मानस मध्ये सांगतात की, कर्म प्रधान विश्व करि राखा म्हणजे आपण नेहमी कर्म करीत राहील पाहिजे। भगवतगितेच्या दुसऱ्या अध्यायात सत्तेचाळीसावा श्लोक आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि। अर्थात तुझा अधिकार केवळ कर्म करण्याचा आहे, त्याच्या फळांवर नाही, म्हणून तुझा कर्म करण्याचा उद्देश फळप्राप्ती हा नको, कर्म न करण्यामध्येही तुझी आसक्ती नको। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.

Comments
Post a Comment