नित्य कर्म व नैमित्तिक कर्म म्हणजे काय, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म।



नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नित्य कर्म व नैमित्तिक कर्म म्हणजे काय, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म। कर्मसिध्दांत हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचारप्रवाह आहे। मुख्य उत्तराकडे येण्याअगोदर कर्म कशाला म्हणतात, आणि ते कसे घडते, याबद्दल थोडी माहिती करून घेऊ। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, कर्माचे तीन प्रकार पडतात, जे आपण दररोज काही ना काही चांगले वाईट, कळत न कळत करीत असतो, त्याला क्रियमान कर्म म्हणतात। आपण ज्या वेळेस क्रियमान कर्म करतो, त्यावेळेस जसे आपण गरजेपेक्षा जास्त आर्थिक, आवक असल्यास, गरजेनुसार वापर करुन इतर पैसा बँक किंवा इतर ठिकाणी भविष्यात वापर करता यावा, म्हणून संचय करून ठेवतो, तसेच क्रीयमान कर्म पण गरजेनुसार वापर करुन उर्वरित क्रीयमानकर्म असते, ते संचित कर्म म्हणून संचय होतो। त्याला आपण संचित कर्म म्हणतो। वर्तमान काळात आपण एखादे क्रीयमान कर्म करीत असतो, त्यावेळेस कधी कधी ते कमी पडते। ते वाईट किंवा चांगलेही असु शकते। त्यावेळेस संचित कर्मानुसार फल प्राप्ती होते, त्याला आपण प्रारब्ध कर्म असे म्हणतो। अजून पुढे जाऊन आपण असे म्हणू शकतो, क्रियमान कर्म तत्काळ फळ देते। ज्या कर्माचे फळ कालांतराने मिळते, ते संचित कर्म। योग्य वेळी व संधी मिळाल्यावर जेव्हा संचित कर्म फळ देते, तेव्हा त्यास प्रारब्ध कर्म असे म्हणू शकतो। आपण आता प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ या, गीतेत याच तीन कर्मांचे थोडे वेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले आहे। ते अशा प्रकारे आहेत। नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म। गीतेतील वर्णनानुसार नित्य कर्म देहधारी दररोज करतो। उदा, अंगोळ करून देव पुजा आर्चन, उदरनिर्वाह म्हणून केलेला व्यवसाय विशेष प्रसंगी केल्या जाणाऱ्या कर्माला नैमित्तिक कर्म म्हणतात। उदा एखादा सणामुळे विशेष पुजा अर्चना करणे, जसे हरितालिका निमित्ताने माता पार्वतीची पुजा अर्चना करणे तर काही इच्छा मनात ठेवून केल्या जाणाऱ्या कर्माला काम्य कर्म असे म्हणतात। उदा, जसे निश्चित हेतु मनात ठेवून, तीची फल प्राप्ती होण्यासाठी दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी, अश्वत्थ वृक्षाला एकविस् दिवस प्रदक्षिणा घालणे। गीतेत सांगितले आहे की कर्म मनुष्याला बांधून ठेवते। असे असेल तर मनुष्य देहाला त्यापासून मुक्त कशी होणार। हा विषय श्रीकृष्णांनी गीतेत विस्तृतपणे मांडला आहे। भगवान म्हणतात, जोवर मानव जीवन आहे, तोपर्यंत कर्म करावेच लागेल। त्यापासून मुक्ती नाही, जे गृहस्थ सन्यस्त होतात, त्यांनाही कर्म करावेच लागते। त्याकरिता भगवान श्रीकृष्णांनी एक अद्वितीय उपाय सांगितला आहे। व्यक्ती कर्म तर करणारच, परंतु ती कर्मफलाच्या बंधनाने प्रभावित होणार नाही। हा उपाय म्हणजेच आसक्तिरहित कर्म, कर्मफलाची इच्छा मनुष्यामध्ये चिंता आणि उद्वेग निर्माण करते व तो कर्माला बांधला जातो। परंतु, तेच कर्म जेव्हा निस्वार्थ भावनेने केले जाते, तेव्हा व्यक्ती कर्म फळाला बांधली जात नाही। भगवान श्रीकृष्णाने कमळाचे उदाहरण दिले आहे। कमळाचे फूल चिखलात उगवूनसुध्दा त्याच्या वरती असते, त्याप्रमाणे मनुष्य त्रिगुणांनी युक्त जगात आसक्तिरहित कर्म करताना सुध्दा मुक्त होतो। पद्मपत्रभिवाभ्यसा, जेव्हा आम्ही महान व्यक्तींच्या जीवनाकडे बघतो, तेव्हा समजते की लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन निस्वार्थ कर्म करणे, हीच महामानवांची विशेषता आहे। जेव्हा आम्ही भूतकाळातील चिंता आणि भविष्यकाळातील आशंका सोडून वर्तमानकाळात जगणे शिकू, तेव्हाच आम्ही निरासक्त कर्म करण्यास प्रारंभ करु शकू, अशी गीतेची शिकवन आहे। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.  


Comments

Popular posts from this blog

सर्वात मोठे लोक आणि त्यांचे गुपित जीवन — ऐतिहासिक व्यक्तींचे रहस्य, त्यांचे साधन, साधना, आणि जीवनशैली।

पुराणातील १० शक्तिशाली मंत्र आणि त्यांचा प्रभाव — घर, आयुष्य, आणि मानसिक उर्जा बदलणारे मंत्र।

धन आणि संपत्ती वाढवण्याचे ५ रहस्यमय उपाय — वास्तू, ग्रह, आणि कर्माचे योग।