कर्म आणि जन्म मृत्यूचे बंधन



नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, कर्म आणि जन्म मृत्यूचे बंधन म्हणेजे काय आहे, पूर्व जन्माच्या कर्माची फळे या जन्मी भोगावी लागतात का. तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात. किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगते. पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग भोगण्यासाठीच, आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात. तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही, आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच. मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा? हा तिढा सुटणार तरी कसा? मोक्ष मिळणार तरी कसा ? पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि, कर्म घडतात तरी कशी? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे? विचार केला कि लक्षात येते कि, कर्माचे मूळ, इच्छा हे आहे. इच्छाच कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग इच्छा कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते, म्हणजेच सर्व कर्मांचे मूळ हे आपले मन आहे. मनात इच्छा का उत्पन्न होतात? मन हे अहं भावनेने भरलेले असते. ते सतत आपले अस्तित्व दाखवण्या साठी झघडत , धडपडत असते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सतत इच्छा निर्माण करत असते, व कर्म घडवून आणत असते. मन हे इच्छे वरच जगते, कर्मांच्या फळावरच ते जगते व पोसले जाते. कर्म संपली की मनाचे अस्तित्वच संपले, वेदांत व संतांची उक्तीच आहे की मन मेले की अहं किंवा मी मरतो, मी मेला की कर्म कसे घडणार ? घडणारच नाही, आणि कर्मच जर संपले तर फळ कोठून येणार ? फळच नाही तर ते भोगायला जन्म कुठचा ? आपण वर पहिले की कर्म कसे घडते, पण कर्म म्हणजे नेमके काय ? त्याची संज्ञा काय, हे पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा की तुम्ही या जगात एकटेच आहात, दुसरे कुणीच नाही. मग तुम्ही खाता पिता, झोपता उठता, चालता फिरता, विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत, हे कर्म जरी असले, तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत. तेव्हा ही कर्मे नव्हेत, आता समजा तुम्ही चालला आहात, चालता चालता तुम्हाला एक मुंगी दिसली, व तुम्ही तिला ठेचलीत, तर हे मात्र कर्म झाले. किंव्हा तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत असताना, एक व्यक्ती बुडताना पाहून तुम्ही त्या व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत, तर हे सुद्धा कर्म या संज्ञेस पात्र ठरते. तेव्हा विचार केल्या वर लक्षात येईल की, कर्म घडण्या साठी त्या कर्माचे संस्कार एकापेक्षा अधिक जीवांवर घडले पाहिजेत, तेव्हाच कर्म घडते. हे असे आपले मला वाटते, तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही. पटले तर घ्या, नाहीतर सोडून द्या. आता आपण पहिले की, मनातल्या मी ला मारले की मन मरते. मन मेले की कर्म घडत नाही, मग मनाला मारावे म्हणजे काय ? व ते कसे करावे ? कठ उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे, कर्म ही दोन प्रकारची असतात, एक असते श्रेयस कर्म, व दुसरे असते प्रेयस कर्म. जीवाने कोणत्या कर्माचा आचरन करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते. मनाचा कल हा नेहमी प्रेयासाकडे असतो, तो प्रथम श्रेयासाकडे वळवायला हवा, कारण प्रेयासामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते, व मी ची लालसा वाढते. मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे ? तर ते विवेकाने वाळवावे. विवेक बुद्धीत असतो, पण बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर, विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे, जे मनावर विजय मिळवून, त्या मी ला मारण्यास समर्थ आहे. ते नसेल तर काही उपयोग नाही, मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते मिळवता येते. ते एकदा मिळाले की, श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो. तो विजय मिळवला की मी मेलाच म्हणून समजा. मी मेला की मनाचे अस्तित्व संपलेच, मन संपले की द्वैत संपते, द्वैत संपले की कर्मा नष्ट होतात. एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे, तिथे कोठला मी आनी कसले कर्म ? कसला जन्म आणि कसला मृत्यू ? कोठेच काहीच नाही. संत सोहिरोबानाथ म्हणतात तसे, आलो नाही , गेलो नाही, मध्ये दिसणे हे भ्रांती ई जागृत होता स्वप्नची हरपे, कर्पूरन्याये जग हरले. कर्म हे अटळ आहे, जिवंत रहाण्यासाठीसुद्धा श्वास घेण्याचे कर्म करावेच लागते. कर्म करतांना व्यक्तीचा इतरांशी सारखा देवाणघेवाण, संबंध निर्माण होत असतो. तसेच प्रत्येक कर्माला पाप पुण्यात्मक फळ हे असतेच. रागद्वेषादी स्वभावदोष, कुबुद्धी, अधर्माचरण, कर्म करतांना होणाऱ्या चुका, इत्यादींमुळे व्यक्तीचे पाप वाढत जाते. त्याचे दुखरूपी फळ या नाहीतर पुढच्या कोणत्यातरी जन्मात भोगावे लागतेच लागते. असे जन्म मृत्यूचे चक्र चालूच रहाते, यालाच कर्मबंधन म्हणतात. असे असतांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटायचे कसे’ याचा मार्ग कर्मयोग सांगतो. कर्मफल नसले तरच मनुष्य बंधनमुक्त होऊ शकतो. कोणत्याही कर्माविषयी आसक्ती, अभिमान आणि फलाची अपेक्षा न बाळगणे, प्रत्येक कर्म म्हणजे ईश्वराची पूजा आहे. अशा भावाने करणे, कर्म झाल्यावर ते ईश्वरचरणी अर्पण करणे इत्यादींमुळे कर्मात निष्कामता येते. आपले विचार, आवडी निवडी, इच्छा इत्यादी काळ, वेळ, स्थळ, वातावरण, अवती भवती असलेले लोक आणि त्यांची भाषा, संस्कार, संस्कृती इत्यादीनुसार बदलत असतात. बहुतेक लोक भारतात कुठेही कचरा टाकतात, कुठेही थुंकतात, कसेही बसतात, उभे राहतात आणि जोरजोराने बोलून टाळ्या देतात, मात्र हेच लोक अंतर राष्ट्रीय फ्लाईट घेण्यासाठी एअरपोर्ट वर गेल्याबरोबर, त्यांच्या एकंदरीत बोलचाल, हावभाव, स्टाईल ह्यात खूप बदल दिसून येतो. बऱ्याच दिवस आधी मला दुबईला जाण्याचा योग्य आला. सुदैवाने त्या फ्लाईट वर महाराष्ट्रीयन लोकांची मेजॉरिटी होती. एअरपोर्ट वरच बऱ्याच बायांनी साड्या सोडून जीन्स टॉप मध्ये अवतार घेतला. कपाळावरील बिन्द्या कुंकू नाहीसे झाले. फ्लाईट मध्ये बऱ्याच भगिनींनी बियर, वाईन ने एकदुसऱ्यांना त्यांच्या हैप्पी जर्नी साठी टोस्ट केले. जेवण पण नॉनव्हेज घेतले. पुरुषांची गोष्टच सोडा, दारू फुकटची मिळते म्हणून स्टवॉर्डला वेळोवेळी बोलावून आपले व्हिस्की चे ग्लासेस भरून घेतलेत. डेजर्ट सफारी मध्ये बकऱ्याचे मास, कोंबडीचे मास, गोमांस इत्यादी मुबलक प्रमाणात वाढल्ये जात होते. आमच्या मराठी आणि इतर भारतीय बंधूनी कबाब घेताना हे कधी बघितलेच नाही, कि ते बीफ कबाब होते. लॅम्ब कबाब होतेत कि चिकन कबाब, ह्याचे कारण हे कि तिथे रेड लेबल मुबलक मिळत होती, आणि पैशाची कुणालाच पर्वा नव्हती. नवरे रंगात येऊन आपले ग्लास बायकोच्या ओठाशी लावून, तिला पण टेस्ट करायची संधी देत होते. भारतीय लोक खायला मुबलक मिळाले तर ताटात खूप वाढून घेतात, आणि संपले नाहीत तर कचऱ्यात फेकून देतात. त्यासाठी प्रतिबंधात्मक सूचना म्हणून मलेशियाच्या भारतीय रेस्टारंटस मध्ये बुफे टेबलच्या बाजूला, एक हिंदीत पाटी दिसून येते. त्याचा आशय हा कि कुठलेही खाद्यपदार्थ फेकल्या गेले तर शंभर रिंगेट्स दंड आकारल्या जाईल. जे लोक भारतात पानात अर्धे अधिक पदार्थ सोडून देतात, ते मलेशियात पानाला चाटून पुसून खातात. जे लोक दलित आदिवासी ह्यांना अस्पृश्य समजतात, ते पश्चिमी देशात जेव्हा त्यांनाच काळा आदमी म्हणून हिणविल्या जातात, तेव्हा ते अपारथेड रंगीत लोकांच्या चळवळीत सहभागी होतात. सरडा वातावरणानुसार रंग बदलत असतो असे म्हणतात तीच गोष्ट माणसा साठी सुद्धा लागू होते. तफावत इतकी कि सरड्याची रंग दिसून येतो, अन माणसाचा रंग दिसून येत नाही. हे सर्व सांगण्या मागचं कारण काय, तर कारण हेच आहे कि, असं जर आपण आपली संस्कृती सोडून वागलोत तर, ह्या सर्व कर्माची फळे तर आज ना उद्या भोगावीच लागणार ना. आपण कुठे ही गेलोत तरी आपण आपली संस्कृती सोडली नाही पाहिजे. जीवनामध्ये नेहमी चांगले कर्म केले पाहिजे, तरच आपण मोक्ष प्राप्त करू शकतोत. तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.  

Comments

Popular posts from this blog

सर्वात मोठे लोक आणि त्यांचे गुपित जीवन — ऐतिहासिक व्यक्तींचे रहस्य, त्यांचे साधन, साधना, आणि जीवनशैली।

पुराणातील १० शक्तिशाली मंत्र आणि त्यांचा प्रभाव — घर, आयुष्य, आणि मानसिक उर्जा बदलणारे मंत्र।

धन आणि संपत्ती वाढवण्याचे ५ रहस्यमय उपाय — वास्तू, ग्रह, आणि कर्माचे योग।