दुष्कर्म कुणाचे भोग कुणाला, असं म्हणतात की पूर्वजन्मी ची चांगली, आणि वाईट कर्म घेऊन आपण जन्माला येतो।



नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दुष्कर्म कुणाचे भोग कुणाला, असं म्हणतात की पूर्वजन्मी ची चांगली, आणि वाईट कर्म घेऊन आपण जन्माला येतो। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, जन्म हे पूर्व जन्माच्या कर्मांचे फलित आहे, असे वेदांत सांगतो। पण काही वेळा डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे, चुकीमुळे किंवा पैशाच्या लोभामुळे जन्माला येणाऱ्या बाळाला, आणि त्याच्या कुटुंबीयांना आयुष्यभर त्रास, आणि दुखं भोगावं लागतं। डाॅक्टर हे देवाचे दुसरं रुप असतं असं म्हटले जाते। म्हणून आपण त्यांच्या वर पूर्ण विश्वास टाकतो। ते सांगतील तेच करतो कारण, आपली त्यांच्यावर असीम श्रद्धा असते। आईच्या पोटात बाळाची पूर्ण वाढ झालेली असतानाही, सोनोग्राफी मधे बाळाने शी केली आहे हे कळल्यानंतर सुद्धा डाॅक्टर सिझरियन करण्याचा निर्णय दुसऱ्या दिवसावर ढकलतात। कारण केवळ एवढच असतं की, त्यांच्या कडे भूल देणारा डॉक्टर नसतो। दुसर्या दिवशी सुद्धा सिझेरियन करायच्या ऐवजी फोरसेप्स केलं जातं का, नाही माहीत। ते प्रयत्न निष्फळ होतात म्हणून ते फोरसेप्स अर्धवट ठेवून नंतर सिझरियन करण्यात येतं। बाळाच्या पोटात गेलेली शी सुद्धा एक नर्स बाळाच्या पोटात, नळी घालून काढते आणि अशी नर्स जी घर कामे करते। आईने नऊ महिने काळजी घेऊन वाढवलेल्या साडेतीन किलोच्या सुंदर बाळाला, केवळ डाॅक्टरांच्या मुळे आयुष्य भरासाठी, समाजाकडून विशेष मुल म्हणजे स्पेशल चाईल्ड असा किताब बहाल केला जातो। डाॅक्टरांच्या पापाचे खापर बाळाच्या आणि, त्याच्या आई वडिलांच्या डोक्यावर फोडलं जातं। अज्ञानी लोकांच्या दयेला, थट्टा मस्करीला सामोरी जावं लागतं। गेल्या जन्मी च्या पापांची शिक्षा आहे, असे वर्तमानकाळात वाईट कर्म करणारे लोक उपदेशांचे धडे बाळाच्या आई वडिलांना देतात। विशेष मुलांच्या शाळेत दहा ते पंधरा हजार मासिक फी असते। आणखी अनेक समस्या ज्या कोणी कल्पना सुद्धा करू शकणार नाहीत। काय वाटतं तुम्हाला ही चूक त्या डाॅक्टरांची नाही, असं म्हणतात कि, आपल्यावर आलेल्या परिस्थितीला दुसऱ्यांना दोशी ठरवू नये। आपलं नशीब आणि, भोग म्हणून गप्प बसून रहावं। म्हणजे महात्मा गांधीच्या तत्वांवर चालावं, एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करावा, का वीर सावरकरांसारखं आणि, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्यांच्या विरोधात आपल्या हक्कासाठी लढावं का, राजयोग मधे सांगितले जाते तसं आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला सगळं विसरून माफ करावं। बोलतात ना शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये। म्हणून गुपचूप सर्व विसरण्याचा प्रयत्न करावा आणि आयुष्यभर देव, धर्म, कर्म, नशीब म्हणत सहन करत रहावं। प्रयत्नांची पराकाष्ठा करत रहावं आणि हे असे, डाॅक्टर्स आपलं कर्तव्य विसरून आयुष्यभर मजा मारत अशा प्रकारच्या अनेक चुका करतच रहावेत। पण कधी पर्यंत, भगवद्गगीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा कोणी आपल्याला मिळालेल्या वरदानाचा, शक्तीचा गैर वापर व, अहित करतो तेव्हा मी स्वत कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येऊन त्याचा अंत करतो। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.  


Comments

Popular posts from this blog

सर्वात मोठे लोक आणि त्यांचे गुपित जीवन — ऐतिहासिक व्यक्तींचे रहस्य, त्यांचे साधन, साधना, आणि जीवनशैली।

पुराणातील १० शक्तिशाली मंत्र आणि त्यांचा प्रभाव — घर, आयुष्य, आणि मानसिक उर्जा बदलणारे मंत्र।

धन आणि संपत्ती वाढवण्याचे ५ रहस्यमय उपाय — वास्तू, ग्रह, आणि कर्माचे योग।