खरंच पुनर्जन्म असतो का।



नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, खरंच पुनर्जन्म असतो का। नशीब हसते आहे, तसेच रडतं आहे असे समजल्यास आतिशयोक्ती होईल। कारण काही लोकं म्हणतात की, नशीब नसतंच मुळी। मग हसण्याचा कोणता प्रसंग आला। परंतू मला वाटते की ते खोटं आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात नशीब असतं। ते नशीबच कमी अधीक प्रमाणात असतं। याचं एक उदाहरण देतो। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, जन्म मरण ठरलेलं असतं। मरणाचं तर सांगू शकत नाही, परंतू जन्माबाबत सांगतोय, प्रत्येकाचा जन्म हा ठरलेला असतो। प्रत्येकच मनुष्य हा गरीबाच्या घरी जन्मास येत नाही, वा प्रत्येकच व्यक्ती हा श्रीमंतांच्या घरी जन्मास येत नाही। तसेच प्रत्येकाचा जन्म हा ठरलेला असतो। मग विचार करा की असे का होते आणि, याला काय म्हणावे। महत्वाचं म्हणजे यालाच नशीब म्हणता येईल। नशीब हे सर्वांना सारखं मिळत नाही। असं जर झालं असतं तर प्रत्येकच व्यक्ती हा, पंतप्रधान झाला असता व प्रत्येकच व्यक्ती हा राष्ट्रपती। परंतू असं होते का, तर याचं उत्तर नाही असंच आहे। प्रत्येकाचा जन्म हा त्याच्या, नशिबानुसार होत असतो व प्रत्येकाच्या नशिबात त्या, जन्मानुसार ते ते तत्व येत असतात। प्रत्येकाचे नशीबानुसार कर्मही ठरलेले असतात। सुख दुखही याच नशीबानुसार मिळत असतात। कोणाच्या नशिबात जास्त सुख असतं, तर कोणाच्या नशीबात अल्प सुख। यानुसार कोणी जन्मतच मरण पावतो तर कोणी आयुष्याची शंभर वर्ष झाली, तरीही मरत नाही। कोणी साठ वर्षातच म्हातारा झाल्यासारखा वाटतो। त्याला धड चालता वा बोलता येत नाही। तर कोणी शंभर वर्षाचे असतात, परंतू अगदी ठणठणीत असतात। आवाजही कणखर असतो, जसे ऐतिहासीक पुस्तक लेखन करणारे म रा जोशी आज ब्यानव वर्षाचे आहेत। परंतू अजूनही त्यांचा आवाज कणखर आहे। नशीब ही माणसाला मिळालेली उदात्त देणगी आहे। कोणी म्हणतात की आपल्याला नशीब घडवता येतं, नशीब आपल्या चांगल्या वाईट कर्मानुसार घडतं, परंतू असं मला वाटत नाही। कारण मला वाटतं की नशीबच आपल्या जीवनातील चांगले वाईट कर्म घडवतात। त्याही पुढे जावून लोकं म्हणतात की, नशीब घडतं हे मागील जीवनातील चांगल्या वाईट कर्मानुसार। मागील जन्मात जर चांगलं कर्म केले तर या, जन्मात त्याची चांगली फळं चाखायला मिळतात व, मागील जन्मात जर वाईट कर्म केले तर त्याचे परिणामही, या जन्मात वाईट रुपात मिळत असतात। त्यानुसार मागील जन्मातील वाईट कर्मानुसार या जन्मात वाईट व्यक्तीचा जन्म हा गरीबाच्या घरी व, चांगल्या व्यक्तीचा जन्म हा चांगल्या व्यक्तीच्या घरी होत असतो। त्यानुसार कोणी गरीबाच्या घरी तर कोणी श्रीमंतांच्या घरी जन्म घेत असतो। कोणी म्हणतात की मागील कर्म हे कोणं पाहिलं, तसेेच मागील जन्म कोणं पाहिला, पुनर्जन्म काही होत नाही। त्यामुळं मागील जन्मातील चांगल्या वाईट कर्माचं मुल्यांकन करता येत नाही। परंतू इतरांंना काय वाटते माहीत नाही, मला तर वाटते की हा मिळालेला जन्म कदाचीत मागील जन्मातील चांगल्या वाईट कर्माचा परिणाम असू शकतो। त्यानुसार तो व्यक्ती कोणी श्रीमंतांच्या घरी वा, कोणी गरिबांच्या घरी जन्म घेवू शकतो। परंतू काही लोकं मला असं सांगतात की आपण लेखक आहात, आणि असा पुुनर्जन्म व पापपुण्य, आणि नशिबावर विश्वास कसा औकरता। तर त्याचं उत्तर असं आहे की, नशीब आणि पापपुण्य आणि पुनर्जन्म नाही तर प्रत्येकाचा जन्म हा गरीबांच्या घरीच नको व्हायला, प्रत्येकांचा जन्म हा श्रीमंताच्या घरीच व्हायला हवा, तसंच हे मी जे सांगीतलं, तर ते सत्यच व्हायला हवं। आज नशीब असंच आहे। काहीशा पुनर्जन्मावर व, काहीशा मागील जन्मातील पापपुण्याच्या कर्मावर आधारीत काहींचंं नशीब हे वाईट असतं तर काहीचं नशीब हे चांगलं असतं। काही जणांचं नशीब हे रडत असतं तर काहीचं नशीब हे हसत असतं। काहींना सतत या जन्मात त्रास भोगावा लागतो, तर काहींना या जन्मात सतत आनंद मिळत असतो। एवढा आनंद की तो मोजता येत नाही, मापताही येत नाही। तसेच असा आनंद भोगायला चांगले कर्म हवे असते। जे आपण चांगले कर्म करतो ना, तेच चांगले कर्म आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येत असतात। त्यानुसार आपला जन्म चांगल्या कुटूंबात होत असतो। अगदी आनंदातही होत असतो, हा आनंद चिरकाल टिकणाराही असतो। तसंच वाईट कर्म केल्यास वाईट कर्माचा परिणाम वाईटच होतो, वाईट कर्म केल्यास वाईट कर्मानंतर त्याचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा त्याला त्या पुढच्या जन्मात त्याचे गंभीर, आणि वाईट परिणामही भोगावेच लागतात। त्यानुसार त्याचा जन्मही गरीबीत होतो व जीवनभर त्याला गरीबीच छळत असते। वर म्हटल्यानुसार त्याचा अर्थ अंधश्रद्धा पाळणे वा, त्यावर विश्वास करणे असा होत नाही, ती अंधश्रद्धा पाळूही नये। परंतू पाप पुण्य कर्माची भिती नक्कीच ठेवावी। आपलाही पुनर्जन्म होत असेल, हेही लक्षात घ्यावे, जो आपण पाहिलेला नाही। तसेच त्या त्या जन्मात मागील जन्मातील पापपुण्याचे चांगले परिणामही पाहायला मिळतात हे ही लक्षात घ्यावे। आपल्याला जर पुढील जन्म आनंदात आणि मजेत घालवायचा असेल तर या जन्मात चांगले कर्म करावे। वाईट कर्म करु नये, जेणेकरुन पुढील जन्म चांगला मिळावा व त्याही जन्मात आनंद, आणि सुख मिळवता यावं। मग त्या जन्मात प्रत्येकाचं नशीब रडू नये, ते हसावं। याचाच विचार करुन या जन्मात जगावं, या जन्मात आपल्या नशिबात जरी मागील जन्मातील चांगला वाईटपणा असेल तरी, या जन्मात चांगले कर्म करावे। जेणेकरुन पुढील जन्मात त्याचे गोड फळ चाखायला मिळेल, व मागील सर्व पापकर्म धुवून जातील। महत्वाचं सांगायचं म्हणजे पुनर्जन्म आहे, किंवा नाही हे मला स्पष्ट स्वरुपात माहीत नाही। परंतू मला वाटते की पुनर्जन्म होत असावा व, त्यानुसार प्रत्येकाला त्या त्या कर्मातील चांगले वाईट फळ या जन्मात मिळत असावीत व त्यानुसारच प्रत्येकाचा जन्म हा गरीब, श्रीमंतांच्या घरी होत असावा ही सत्य बाब आहे। म्हणून कर्म चांगलेच करावे, वाईट करु नये, मग तो कोणताही जन्म असो, पुुनर्जन्म असो वा नसो, त्या कर्माचे मापदंड असो वा नसो। महत्वाचं म्हणजे कर्माचं मुल्यांकन होतं। नाही होत असं नाही, या जन्मात नाही झालं तर पुढील जन्मात। म्हणून चांगलं कर्म करावं, मग तुम्ही पुनर्जन्मावर विश्वास करा वा नका करु हेे तेवढंच खरं आहे हे सांगायला नको। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.  


Comments

Popular posts from this blog

सर्वात मोठे लोक आणि त्यांचे गुपित जीवन — ऐतिहासिक व्यक्तींचे रहस्य, त्यांचे साधन, साधना, आणि जीवनशैली।

पुराणातील १० शक्तिशाली मंत्र आणि त्यांचा प्रभाव — घर, आयुष्य, आणि मानसिक उर्जा बदलणारे मंत्र।

धन आणि संपत्ती वाढवण्याचे ५ रहस्यमय उपाय — वास्तू, ग्रह, आणि कर्माचे योग।