दुखी असताना काय करावे व काय करू नये
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दुखी असताना काय करावे व काय करू नये। आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते, छान जगता आलं पाहिजे। दुखी असताना बऱ्याच गोष्टी नकळत घडून जातात, किंवा आपल्याकडून केल्या जातात। पण काही गोष्टी अश्या आहेत ज्या दुखात असताना कधीच करू नयेत। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, काय करू नये, आपलं दुख पटकन कोणाला सांगू नये, याला कारणही तसंच आहे। ज्या व्यक्तीजवळ आपण आपलं दुख व्यक्त करतोय, ती आपल्याला समजून घेतेय की नाही, हे त्या समोरच्या व्यक्तीवर, अवलंबून असते त्याच्या कुवतीप्रमाणे। कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात, कोणी कोणाचं दुख समजून घेऊ शकत नाही हेच अंतिम सत्य आहे। त्या दुखातून फक्त आणि फक्त तुम्ही स्वतच खंबीरपणे बाहेर येऊ शकता। जेंव्हा मन दुखी असेल तेंव्हा जास्त रडू नये यामुळे, तुमच्या आरोग्यावर खूप खोलवर परिणाम होतो। जास्त राडल्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो, चक्कर येऊ शकते परिणामी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये देखील ऍडमिट व्हावं लागू शकत। दुखात असताना कधीही देवाला किंवा, नशिबाला दोष देऊ नये देव त्याच कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत असतो। आपल्याला नक्की काय करायला हवं आपलं कुठे चुकतंय का याचा विचार करून, आपणच आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे। काय करावे, दुखात असताना सकारात्मकतेसाठी स्वेच्छेने, आपल्या आवडत्या देवाचा जिथे आपली, श्रद्धा मनापासून असेल त्या देवाचा जप करावा। नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावे, ज्या गोष्टींमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होईल असं काही करू नये। जितका जास्त सकारात्मक विचार करता येईल तितका करावा। दुखात असताना आपल्या मनात येणारे विचार इतरांना सांगण्यापेक्षा, आपल्या डायरीत लिहून ठेवावे। शांत राहावे चिडचिड करू नये। शक्य तितके एकांतात रडून घ्यावे त्यामुळे, मनावरचा भार हलका होईल.पण जास्त रडू नये। शक्य असल्यास आनंदी संगीत ऐकावे, संगीत ही अशी गोष्ट आहे त्यामुळे आपण आपल्या, भावना योग्य पद्धतीने व्यक्त करू शकतो। मनाविरुद्ध किंवा एखादी अनपेक्षित धक्कादायक घटना घडली की माणसाला दुख होणे स्वाभाविक आहे। पण त्याच्या मुळात जाऊन कारण शोधल्यास, त्या अवस्थेतून बाहेर यायला नक्कीच मदत होऊ शकते। थोडक्यात विवेकाने काम घ्यायला हवे। परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे दुख झाले, शेम्बर प्रतिशद प्रामाणिकपणे अभ्यास करूनही जर कमी गुण मिळाले, असतील तर दुर्दैव पण आयुष्य तिथे संपत नाही। आपल्याला जवळची अशी कोणी व्यक्ती निधन पावली, जे तत्वज्ञान आयुष्यभर वाचले आहे, ते जर पचले असेल तर माणूस आपोआप बाहेर येतो। पण त्यासाठी आधी तत्वज्ञान जाणून तर घ्यायला हवे। एखाद्या तरुण व्यक्तीचा अपघात होतो, आणि थेट मृत्यूची बातमीच कानी पडते। धक्का बसणे अगदी स्वाभाविक आहे, पण यावर केवळ काळ हे एकमेव औषध आहे हे जाणून शक्यतो मनावर ताबा ठेवावा। जवळच्या माणसाने विश्वासघात केला आणि फसवले शांत रहावे। कायदेशीर कारवाई करायची असेल तरीही डोके थंड ठेवावे, तर अजून परिणामकारक उपाय सुचू शकतील। अविचाराने केलेले कृत्य संकटात भर घालू शकते। हे सर्व तत्त्वज्ञान शब्दज्ञान म्हणून सांगणे सोपे आहे पण ज्याच्यावर प्रसंग येतो, तेव्हाच त्याचे चटके बसतात असे जरूर वाटू शकते। पण तहान लागल्यावर विहीर खणून चालते का, नाही। तसेच सामान्य किंवा चांगले दिवस असताना जर हे जीवनविषयक तत्वज्ञान वाचले, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पचवले तर, आणि तरच ते कठीण प्रसंगी ते कमी येऊ शकते। मात्र कितीही दुख झाले तरीही, व्यसनाच्या कोणत्याही नशेच्या आधीन होऊ नये। अगदी क्वचित आणि, मजा म्हणून मद्यपान करणाऱ्या माणसानेही दुखी आहोत, या कारणासाठी म्हणजे दुख विसरण्यासाठी म्हणून मद्यपान करू नये। कारण त्यातून दुखाचे कारण तर नाहीसे होत, नाहीच पण जर दारूचे व्यसन लागले तर, नवीन दुखांना ते निमंत्रण होऊ शकते। आरोग्याची हानी तर होतेच पण पैशाचाही नाश होतो, आणि कुटुंब अस्थिर होते ते वेगळेच। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.

Comments
Post a Comment