आपलं नशीब खरंच आपल्या हातात आहे का।



 नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपलं नशीब खरंच आपल्या हातात आहे का। आपलं नशीब आपण स्वतच्या हातात घेऊ शकतो का, तसं करता येत असेल तर त्याचा मार्ग काय, या आणि अशा बर्याच प्रश्नांचा सद्गुरू इथे आढावा घेतात। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, प्रत्येक व्यक्तिसाठी मग ती कोणी का असेना त्याचं जीवन महत्वाच आहे। त्याचं जीवन जर महत्वाचं आहे तर, अर्थातच त्याची सुख समृद्धी सुद्धा त्याच्यासाठी महत्वाची असणारच। लोक आपल्या आयुष्याचा खूप सारा वेळ सुख समृद्धी साधण्यामध्ये गुंतवतात। तुम्हाला असं दिसून येईल की, काही लोक इंजीनियर बनून आपली, उपजीविका कामावण्यासाठी आयुष्याचे पंचविस् वर्ष गुंतवतात। ते आपलं कुटुंब घडवण्यामद्धे आपल्या अर्ध्या आयुष्याची गुंतवणूक करतात। पण आपल्या आंतरिक सुख समृद्धीसाठी ते कितीसा वेळ देतात। आजकाल सर्वजण बाह्य परिस्थिती सुधारण्यात आणि तिचे, व्यवस्थापन करण्यात व्यस्त आहेत। बाह्य परिस्थितीमध्ये तुम्ही कितीही सुधारणा केली तरी तुम्ही ती शेम्बर प्रतिशद परिपूर्ण कधीच बनवू शकत नाही। तसं कोणीच करू शकत नाही, आजच्या जगातले अनेक साधन संपन्न देश या गोष्टीचं जीवंत उदाहरण आहेत। त्यांनी बाह्य परिस्थितिल पुरेसं सुधारलं पण तिथल्या लोकांची अवस्था जरा बघा। अमेरिकेच उदाहरण बघितलं तर लक्षात येईल की बाह्य परिस्थिति इतकी संपन्न असूनही तिथल्या खूप सार्या लोकांना डिप्रेशनवर, औषध घ्यावं लागतंय। रोजचं जीवन साध्या समजूतदारिनं जगण्यासाठी सुद्धा त्यांना रोज औषध घ्यावं लागतं, याला सुख समृद्धी म्हणता येणार नाही। तुमच्यापैकी जे लोक यशस्वी आहेत कमीत कमी तुमच्या ऐहिक जीवनात त्यांना ही एक गोष्ट लक्षात आलीच असेल की, जोवर तुम्ही योग्य गोष्टी करत नाही तोवर तुम्हाला यश मिळत नाही। अजूनही तुम्हाला असं वाटतं का, की आपण मूर्खा सारखं वागू आणि मग थोडी प्रार्थना वगैरे करून सगळं ठीक होऊन जाईल। नाही, तुम्हाला माहितीये की बाह्य जगात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य गोष्टीचं कराव्या लागतील, नाहीतर यश मिळणार नाही। मग आंतरिक जगासाठी ते लागू पडणार नाही असं तुम्हाला का वाटावं, आंतरिक गोष्टींच्या बाबतीत देखील जोवर तुम्ही योग्य गोष्टी करत नाही तोवर तुम्हाला यश मिळणार नाही। बाह्य जगात सुख समुद्धी निर्माण करण्यासाठी जसं एक विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, तसंच एक मोठ विज्ञान आणि तंत्रज्ञान योग विज्ञान आंतरिक सुख समृद्धी निर्माण करण्यासाठी सुद्धा आहे, आणि त्यातोगेच तुम्ही तुमच्या नशिबाचे मालक बानु शकता। कुठलीच गोष्ट पूर्वनियोजित नाही कुठलीही गोष्ट पूर्वनियोजित नाही, अगदी मृत्यू सुद्धा, प्रत्येक गोष्ट तुम्हीच निर्माण केलेली आहे। पण त्यातल्या बहुतांश गोष्टी तुम्ही अजाणतेपणी निर्माण केल्या, हीच खरी समस्या आहे। आणि म्हणून तुमच्यावर बाहेरून कुठूनतरी त्या लादल्या जात आहेत असं तुम्हाला वाटतं। तुम्ही जर एखादी गोष्ट अजाणतेपणी निर्माण करू शकत असाल तर तीच गोष्ट तुम्ही सजगपणे सुद्धा निर्माण करू शकालच। सर्व योग प्रक्रियांचा मूळ उद्देश हाच आहे की अजाणतेपणी जीवन निर्माण करून ते धडपडत जगण्या ऐवजी तुम्ही तुमचं जीवन सजगपणे घडवावं। एकदाका त्या दृष्टीनं तुमचे प्रयत्न सुरू झाले की, तुम्हाला दिसून येईल की तुमचं जीवन पूर्वनियोजित नं राहता ते, अधिकाधिक स्व नियोजित व्हायला लागेल। तुमच्या भौतिक शरीरावर तुमचं प्रभुत्व असेल तर तुमच्या जीवनावर, आणि तुमच्या नशिबावर तुमचं पंद्रा ते विस प्रतिशद प्रभुत्व असेल। तुमच्या मनावर तुमचं प्रभुत्व असेल तर तुमच्या जीवनावर आणि तुमच्या नशिबावर तुमचं पनास ते साठ प्रतिसद प्रभुत्व असेल। तुमच्या जीवन उर्जेवर तुमचं प्रभुत्व असेल तर तुमच्या जीवन, आणि तुमचं नशिब शेम्बर प्रतिसद तुमच्याच हातात असतील। अगदी इथवर की तुम्ही तुमच्या मृत्युचा क्षण सुद्धा निश्चित करू शकाल कुठं आणि केव्हा मृत्यू येईल हे सुद्धा ठरवू शकाल। अर्थातच मी आत्महत्ये बद्दल बोलत नाहीये। कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा, कसा घ्यायचा याची सुद्धा निवड तुम्ही करू शकता तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण स्व नियोजित करता येऊ शकतो।

देवावर विश्वास ठेवावा की कर्मावर देवावर विश्वास ठेवावा की कर्मावर, निष्कर्ष करण्याऐवजी सद्गुरू म्हणतात की आपल्यामध्ये सत्याचे शोधक होण्यासाठी लागणारे धाडस, आणि वचनबद्धता असली पाहिजे। प्रश्न, लहानपणापासून, मला देवावर विश्वास ठेवायला सांगितले गेले आहे आणि त्यामुळे मी एक भक्त झालो आहे। पण मग जेव्हा मी हठ योग कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले की, ईशामध्ये संपूर्ण दृष्टिकोन हा कर्म केंद्रित आहे। याचा अर्थ देवाचा कुठेच काहीच सहभाग नाही। एकवीस वर्षांसाठी मी देवावर विश्वास ठेवला आहे। आणि तो आता तोडणे इतके सोपे नाही। कृपया मला यासाठी मदत करा। सद्गुरू, शंकरन पिल्लईच्या लग्नाची वाट लागली होती. तो मॅरेज कौनसेलरकडे गेला आणि विचारले, मी काय करावं। मी काहीही केलं, तरी सगळं चुकीचं ठरतं। मॅरेज कौनसेलरने त्याला सांगितलं, तू तिला नेमकं काय हवं आहे ते विचारलं पाहिजे, आणि ते कसे करायचे याबाबद्दल काही टिप्स दिल्या। जेव्हा शंकरन पिल्लई घरी आली तेव्हा, त्याची बायको स्त्रियांसाठीचे मॅगझीन वाचत बसली होती, आणि तिने वर पाहायचे कष्ट घेतले नाही। त्याने कुठले शब्द वापरावे याबद्दल काही क्षण विचार केला, आणि मग तो म्हणाला, तुला बुद्धिमान पुरुष आवडेल की आकर्षक दिसणारा पुरुष आवडेल, ती काहीच बोलली नाही। मग तो आणखी जवळ गेला, तिच्या शेजारी बसून त्याने पुन्हा विचारले, ऐक ना बुद्धिमान पुरुष आवडेल की आकर्षक दिसणारा पुरुष आवडेल, मॅगझीनमधून डोके वर न काढता ती म्हणाली कुठलाच नाही माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे। ती प्रेम संबंध चालू ठेवण्याऐवजी, निदान लग्न शाबूत ठेवण्याइतकी हुशार आहे। आता जरा तुमच्या भक्तीकडे पाहूया। सुरुवातीला तुम्ही असा निष्कर्ष काढला की, देव आहे। आता तुम्ही या कार्यक्रमात येऊन, असा निष्कर्ष काढला की ईशामध्ये कर्माला जास्त महत्त्व आहे। या कार्यक्रमातून गेल्यानंतर, न जाणो तुम्ही आणखी काय काय निष्कर्ष काढाल। निष्कर्ष काढणे बंद करा. योग म्हणजे आपण शोध घेत आहोत। शोधणे म्हणजे तुमच्या लक्षात आले आहे की तुम्हाला माहित नाही। आणि तुमच्या आत प्रामाणिकतेची एवढी पातळी आलेली आहे की, केवळ सोयीसाठी तुम्ही कुठलीही गोष्ट गृहीत धरायला तयार नाही आहात। एका गृहिताकडून दुसऱ्याकडे, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, देवावर विश्वास ठेवणे, किंवा ते सगळे ज्या देवावर विश्वास ठेवतात त्या देवावर विश्वास ठेवणे, सोयीचे आहे, म्हणून तुम्ही तसे केले। मग तुम्ही इथे आला आणि तुम्हाला वाटले, जर तुम्ही राम, राम, शिवा, शिवा, म्हणत राहिला, तर कदाचित लोक तुम्हाला हसतील। म्हणून आता तुम्ही कर्मावर विश्वास ठेवू लागला। किती वेळ लागला तुम्हाला बदलायला, कृपया स्वत सोबत असे करू नका। तुम्ही इतक्या सहज बदलता याचे कारण तुम्ही सत्य शोधण्यासाठी पुरेसे धाडस, आणि वचनबद्धता एकवटण्याऐवजी, एका गृहिताकडून दुसऱ्या गृहिताकडे जात आहात। सत्याचा शोधक असणे म्हणजे हे मान्य करणे की तुम्हाला माहित नाही। तुम्हाला माहित नाही की या जगावर देव राज्य करतो की, कर्म राज्य करते ही वस्तुस्थिती आहे। सुरुवातीला तुम्ही याने घाबरून जाल. पण ज्या काशीची तुम्हाला भीती वाटते, त्याची काही वेळानंतर सवय करून घेता येते। समजा तुम्हाला एखाद्या खोलीमध्ये आग ओकणाऱ्या ड्रॅगनसोबत बंद करून ठेवले असेल। जर तुम्ही जळून खाक झाला नाही, तर तीन दिवसांनंतर, तुम्ही त्या ड्रॅगनसोबत संवाद सुरू कराल। म्हणून कृपया कुठलीही गृहीते निर्माण करू नका किंवा, एकापासून दुसऱ्याकडे बदलत राहू नका। वस्तुस्थिती अशी आहे की तुम्हाला माहित नाही। ही जाण तुम्हाला सकाळी उठून तुमचा योग सराव करायला लावेल। कुणास ठाऊक, तिथे वर स्वर्ग आहे की नरक, देव आहे की सैतान। निदान तुम्हाला जे माहित आहे, तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या ऊर्जा, तुमच्या भावना ते, तुम्ही सुस्थितीत ठेवा। समजा तुम्ही स्वर्गात गेला तर त्याचा उपभोग घेण्यासाठी तुमच्या चांगल्या स्थितीत असले पाहिजे। समजा तुम्ही नरकात गेला तरी तिथे टिकाव धरण्यासाठी तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे। तर काहीही झाले, तरी तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे। आणि या धरतीवर जगण्यासाठी, आणि यशस्वीपणे कार्य करण्यासाठीसुद्धा, तुम्ही चांगल्या स्थितीत असले पाहिजे। म्हणून तुम्ही देवावर विश्वास ठेवता की नाही याने काही फरक पडत नाही। तुम्ही शाररिक, मानसिक, भावनिक आणि ऊर्जेच्या स्तरावर, चांगल्या स्थितीत असले पाहिजे। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.  

Comments

Popular posts from this blog

सर्वात मोठे लोक आणि त्यांचे गुपित जीवन — ऐतिहासिक व्यक्तींचे रहस्य, त्यांचे साधन, साधना, आणि जीवनशैली।

पुराणातील १० शक्तिशाली मंत्र आणि त्यांचा प्रभाव — घर, आयुष्य, आणि मानसिक उर्जा बदलणारे मंत्र।

धन आणि संपत्ती वाढवण्याचे ५ रहस्यमय उपाय — वास्तू, ग्रह, आणि कर्माचे योग।