तुमच्यामते कर्म म्हणजे काय, याचे कार्य कसे चालते आणि तुम्ही कर्माची कल्पना अर्थपूर्ण आहे का।
नमस्कार प्रिय दर्शकांनो, मराठी club channel वरती आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यामते कर्म म्हणजे काय, याचे कार्य कसे चालते, आणि तुमच्या कर्माची कल्पना अर्थपूर्ण आहे का। कर्म काय आहे कर्म, आपण नेहमी ऐकतो आणि म्हणतो सुद्धा जसे कर्म करू त्याचे फळ तसेच मिळतील। तर मित्रांनो हे video खूप ज्ञानवर्धक होणार आहे, तरी शेवटी परेंत नक्की ऐका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. दर्शकांनो, हे अगदी बरोबर आहे, आपली जशी भावना असेल त्याचे रिझल्ट, तसेच मिळतील आणि निसर्ग जेव्हा हिशोब लावतो। तो शरीराचे नाही तर, मनातील कर्मांचे हिशोब लावतो, म्हणजे मनापासून दुसऱ्यांसाठी आपल्या मनात जी भावना असेल, तीच आपल्याला परत आपल्या जीवनात मिळेल। एकदा एका गावात गरीब माणूस राहत होता, यांच्याजवळ जास्त काही काम तर नव्हते म्हणून, तो पशुपालन करत होता। आणि आपले पशु जसे बकरी, मेंढी, गाय, म्हैस त्यांच्या पासून निघालेले दूध, आणि त्या पासून बनवलेले पदार्थ शहरात जाऊन विकत असे। एक दिवस त्याच्या बायकोने लोणी बनवले तो, एक किलो लोणी घेऊन शहरात जातो। शहरात एक दुकानदार असतो, आणि हा आपल्या वस्तू सहसा त्याच्याकडे विकत असे। आणि समोरून त्या दुकानदाराकडून वेगवेगळ्या वस्तू विकत घेत असे, आणि त्याने हे एक किलो लोणी विकले। आणि त्या बदल्यात साखर, चहा पावडर सारख्या वस्तू खरेदी केल्या हा जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा दुकानदार विचार करतो की, या माणसाकडून मी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करतो। तर, आज मी या लोणीचे वजन करून पाहतो, जेव्हा तो वजन करतो तेव्हा त्याला कळते जे एक किलो लोणी सांगितले ते तर नौशे ग्रॅमच असते याला खूप राग आला की, याने माझ्या विश्वासाचा इतका फायदा उचलला येऊ दे याला परत। जेव्हा तो माणूस परत त्याच्या दुकानावर येतो तेव्हा, दुकानदार त्याला ओरडून सांगतो की, माझ्या दुकानात तू परत पाय सुद्धा ठेऊ नको, धोकेबाज मला एक किलो लोणी देऊन जातो आणि खोटे बोलतो तुझे लोणी नौशे ग्रॅम होते। हा हात जोडून त्याला सांगतो की, शेठजी सर्वात आधी मला माफ करा काही चूक झाली असेल तर परंतु खरी गोष्ट सांगू की, आम्ही इतके गरीब लोक आहोत की, आमच्याकडे वजन करण्यासाठी कुठला ही सामान मोजण्यासाठी असा वजन काटा नाही। तर जे तुम्ही मला साखर एक किलो सांगून देतात त्याच साखरेला मी तराजूच्या एका भागात ठेवतो, आणि दुसऱ्या भागावर आपले लोणी मोजतो आणि सारख्या वजनाचे लोणी मी घेऊन येतो, आणि ते तुम्हाला विकतो। जेव्हा दुकानदाराची भावनाच चुकीची होती तर, फळ तर त्याला तसेच मिळणार होते, यालाच म्हणतात कर्माचे सिद्धांत जसे कर्म करू तसे फळ मिळेल, म्हणतात जे पेराल तेच उगवेल। बाभुळाचे बी पेरून आंब्याची अपेक्षा करू नका ही सृष्टी, आणि प्रकृतीचे नियम इतके न्यायपूर्वक काम करतात, जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला मिळते। दुनिया गोल आहे जिथे सोडले तेच परत मिळेल म्हणून, खूप काळजीपूर्वक राहिले पाहिजे की, आपण काय देत आहे। आपल्या मनात सद्भावना असेल तर, त्याचे फळ तसेच मिळतील परंतु, आपले मन जर दुर्भावनेने भरलेले असेल तर, आपल्याला परिणाम तसेच मिळतील. आणि बऱ्याच वेळा असे परिणाम होतात तेव्हा आपण म्हणतो की, हे देवा माझ्या सोबतच असे का झाले। मला ही असे का दिले तेव्हा थोडा विचार करून पहा की, आपण ही भूतकाळात असे काही सोडले की, ज्यामुळे आज हे परिणाम आलेत। जर आपल्याला आनंद पाहिजे आणि आपण दुसऱ्यांना दुख देत असू तर, आपल्याला ही आयुष्यात दुखच मिळेल आपण जे देऊ तेच मिळेल मग ते प्रेम असो, आनंद असो, सन्मान असो, धोका असो, नफरत असो हे सर्वकाही परत मिळेल। तर मित्रांनो हे video जर तुम्हाला आवडले असेल तर, video ला like आणि channel ला subscribe करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना ही हे video share नक्की करा. धन्यवाद.

Comments
Post a Comment