चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घडतं?
चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का घडतं? नमस्कार दर्शको, तुमचे सर्वांचे आपल्या मराठी क्लब मध्ये स्वागत आहे. तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल, की चांगल्या लोकांच्या मागे नेहमी काहीतरी अडचणी असतात. तुम्ही स्वताही हे अनुभवलं असेल. चांगले कर्म करणाऱ्या चांगल्या लोकांना, नेहमीच त्रास सहन करावा लागतो, असं का? हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर वाईट कृत्ये करणारे आपले जीवन आनंदाने व शांततेने जगत आहेत. तर दरक्षकांनो video सुरु करण्या अगोदर प्रेमाने कमेंट मध्ये जय श्री कृष्ण जरूर लिहा. मित्रानो, जे चांगले काम करतात, त्यांना इतक्या संकटांना का सामोरे जावे लागते, तर जे अधर्माच्या मार्गावर आहेत, ते बहुतेक आनंदी आणि जीवनाचा आनंद घेतात. हा प्रश्न तुमच्याही मनात कधी आला असेल तर, आज आपण त्याचे उत्तर जाणून घेऊ. या प्रश्नाचे उत्तर स्वता श्रीकृष्णांनीच दिले आहे. हे उत्तर तेच आहे, जे भगवत गीतेत लिहिलेले आहे, आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिले होते. भगवत गीते मध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार, अर्जुनच्या मनात जेव्हा जेव्हा कोणतीही दुविधा निर्माण व्हायची, तेव्हा तो श्रीकृष्णाकडे जात असे. एकदा अर्जुन श्रीकृष्णाकडे गेला, आणि म्हणाला, की त्याला कशाची तरी काळजी वाटत आहे, आणि त्याला श्रीकृष्णाकडून उत्तर हवे आहे. श्रीकृष्णाने विचारले काय प्रश्न आहे? अर्जुन म्हणाला, मला जाणून घ्यायचे आहे की, चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते? तर वाईट लोक आनंदी असतात. अर्जुनाच्या तोंडून असे शब्द ऐकून, श्रीकृष्ण हसले, आणि म्हणाले, माणूस जसे विचार करतो आणि अनुभवतो, तसे काहीही घडत नाही. परंतु अज्ञानामुळे त्याला सत्य समजू शकत नाही. अर्जुनाला कृष्ण काय बोलत होते हे समजू शकले नाही, मग श्रीकृष्णाने त्याला समजून घेण्यासाठी काय सांगितले, हे तुम्हाला माहीत आहे का? श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पार्था, मी तुला एक कथा सांगतो, ती ऐकल्यानंतर तुला समजेल की, प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मांचे फळ मिळते. निसर्ग प्रत्येकाला स्वताचा मार्ग निवडण्याची संधी देतो. आता तो मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून आहे, की त्याने धार्मिकतेचा मार्ग निवडायचा की अधर्माचा. कथेची सुरुवात करताना श्री कृष्ण म्हणाले, एका शहरात दोन पुरुष राहत होते, एक माणूस व्यापारी होता, ज्याच्या जीवनात धर्माला खूप महत्त्व होते, तो उपासनेवर विश्वास ठेवत होता, तो दररोज मंदिरात जात होता, आणि दानधर्मही करत होता. आणि दररोज देवाची पूजा करत होता. दुसरीकडे, दुसरा व्यक्ती पूर्णपणे विरुद्ध होता, तो दररोज मंदिरात जात असे. परंतु पूजा करण्यासाठी नाही, परंतु मंदिराच्या बाहेरून चपला चोरत असे. दानधर्म आणि धर्माशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. काही वर्षांनंतर एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्यावेळी मंदिरात पुजारींशिवाय कोणीच नव्हते. ही गोष्ट दुसऱ्या माणसाला कळल्यावर, हीच योग्य संधी आहे असे समजून, त्याने मंदिराचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, आणि पंडिताची नजर चुकवून, मंदिराचे सर्व पैसे चोरले. त्याचवेळी तो व्यापारीही मंदिरात आला. दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला. तेथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. कसा तरी तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला. पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडले नाही. धावत असताना मंदिराबाहेर त्या व्यक्तीचा अपघात झाला, आणि तो जखमी झाला. मग व्यापारी लंगडू लागला, आणि वाटेत त्याला मंदिरातून पैसे चोरलेल्या माणसाला भेटला. तो चोर म्हणाला, आज माझे नशीब चमकले, मला एकाच वेळी इतके पैसे मिळाले. हे सर्व पाहून त्या व्यापाऱ्याला खूप वाईट वाटले, आणि त्याने घरातील सर्व देवाची चित्रे काढून टाकली. दोघेही काही वर्षांनी मरण पावले. मृत्यूनंतर जेव्हा दोघेही यमराजाकडे पोहोचले, आणि त्या सत्पुरुष असलेल्या व्यापाऱ्याने समोर चोराला पाहिले. तेव्हा त्याला खूप राग आला. त्याने संतापून यमराजांना विचारले, मी नेहमी सत्कर्म करत होतो, दानधर्मावर विश्वास ठेवला. त्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि वेदना झाल्या. आणि या व्यक्तीने नेहमीच वाईट कृत्ये केली, तरीही त्याला नोटांनी भरलेले बंडल मिळाले. असा भेदभाव का?यावर यमराज म्हणाले, वत्सा, तुझा गैरसमज आहे. ज्या दिवशी तुझा अपघात झाला, तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस होता. पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही. तुला फक्त किरकोळ दुखापत झाली. तुला या दुष्ट चोराबद्दल जाणून घ्यायचे आहे, खरतर त्याच्या नशिबात राजयोग होता, पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे त्याचे रुपांतर फक्त पैशाच्या गाठोड्यात झाले. कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला आता मिळाले आहे का? देव तुमच्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे असे समजणे अजिबात खरे नाही. देव आपल्याला कोणत्या स्वरूपात काय देतो, हे माणसाला समजत नाही. पण जर तुम्ही चांगले कर्म करत राहिलात, तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते. म्हणूनच आपण आपल्या चांगल्या कर्मांमध्ये बदल करू नये. कारण त्याचे फळ आपल्याला या जन्मातच मिळते. म्हणूनच माणसाचे कर्तव्य आहे की, त्याने नेहमी सत्कर्म करावे. कारण श्रीकृष्णाने गीतेतही सांगितले आहे की, कोणाचेही कर्म व्यर्थ जात नाही, मग ते चांगले असो वा वाईट. चांगल्या माणसाची दोन लक्षणे असतात, चांगले म्हणजे भले करणे, आणि चांगल्याचे रक्षण करणे. चांगलेपणाने जगायचे असेल तर, चांगले पणाचे सत्याचे रक्षण करण्यासाठी, वाईटाबरोबर लढता पण आले पाहिजे. अर्जुन चांगला होता पण लढायला तयार नव्हता. माझे नातेवाईक समोर आहेत, मी त्यांच्याबरोबर लढू कसा ? हा त्याचा प्रश्न होता. जर अर्जुन लढला नसता, तर कौरवांनी त्याला जगायला दिले असते काय ?
पांडव सुखाने जगू शकले असते काय ? सत्याचे रक्षण करण्यासाठी लढाई आवश्यक आहे, हे समजावण्यासाठी श्री कृष्णा यांनी, अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगितली. तेव्हा अर्जुनाने लढाई केली. चांगले पणाने जगायचे असेल तर, दुष्ट प्रवृतींच्या विरोधात यथाशक्ती लढायला शिकले पाहिजे. यथाशक्ती म्हणजे कायदा हातात न घेता, कायदेशीर मार्गाने, विवेक वापरून लढा देता आला पाहिजे. तथागत गौतम बुद्ध लढाई करत नव्हते. पण त्यांची नजर आणि वाणी दुष्ट प्रवृत्ती रोखण्यास समर्थ होती. उदारनार्थ, अंगुलीमाल डाकूला त्यांनी शब्दसामर्थ्यावर रोखले होते. आताच्या कली युगात दुष्ट प्रवृतींना रोखण्यासाठी, कोणत्या मार्गांचा वापर करायचा ते तुम्हीच ठरवा. कमजोर असल्याने कोणताच पर्याय वापरता येत नाही, असे लोक चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का, कसे घडते? असा प्रश्न विचारत जगतात. आपण तर नेहमी चांगलेच वागतो, तर मग आपल्या बरोबर वाईट गोष्टी का घडतात? मला वाटते की असे कसे होईल?कारण जश्यास तसे, ही म्हण ही अस्तित्वात आहेच की. मग गीता आठवते की निष्काम कर्मयोग म्हणजे, काम करा पण मोबदल्याची अपेक्षा करू नका. परत हे ही पटायला कठीण वाटते. तर मग खरे आहे तरी काय, कारण चांगल्या लोकांना समजा असे वाटतय की त्यांना वाईट गोष्टी अनुभवांना सामोरं जावे लागतंय, त्यात ही काही तरी तथ्य असेलच. आता प्रश्नाची फोड करूया, चांगले व्यक्ती म्हणजे कोण? ज्यांना स्वताला वाटते की आपण चांगले आहोत? का ज्यांना समाज चांगले म्हणतो? तुम्हाला वाईट अनुभव देणारा तर नक्कीच तुम्हाला चांगले समजत नसेल, बरोबर ना? नशीबाने वाईट गोष्टी घडत असतील, तर त्या साठी फिर्याद कुठे करणार? मी तर अंतर्मनात डोकावतो अहम् ब्रह्मस्मी पण म्हणतात ना. वाईट गोष्टी म्हणजे, नको असलेले अनुभव, बरोबर ना ? आता जी लोक चांगली असतात, ती जन्मापासून चांगलीच असतात का? त्यांना आयुष्यात वाईट अनुभव कधीही आले नसतील का? का टक्के टोणपे खाऊन ही स्वताचा चांगुलपणा जपुन ती अशी होतात. तात्पर्य, त्यांना ही ख़राब वाईट अनुभव येतच असतील ना? तरी ही ते विचलित न होता, आपल्या चांगल्या स्वभावावर ठाम राहतात, असेच असेल ना? असे ही म्हणतात ना, की वाईट अनुभव माणसाला काही तरी नक्कीच चांगले शिकवतात, मग आपण वाईट अनुभवाला का घाबरतो ?चांगला माणूस व्हायचे हा प्रत्येकाने घेतलेला स्वतंत्र निर्णय असतो. नाहीतर परिस्थिती आपल्याला चांगुलपणाच्या वाटेवरून घसरवायचा प्रयत्न करत असते. पण आपण हटायचे नाही, वाईट अनुभवांना धन्यवाद देऊन आपला चांगुलपणा सोडायचा नाही. इतिहासात तर अनेक किस्से आहेत जे प्रेरणा देतात. पाठीचा कणा ताठ ठेवून पुढे चालत रहायचे. ते घडतं नाही ते घडवल्या जातात, आणि त्या कोण घडवतो तर आपल्याच आसपास रहाणारे स्वताला आपले हितचिंतक म्हणवणारे काही लोकं, काही नातेवाईक जे स्वताला खूप हुशार समजतात. आणि चांगल्या लोकांना बावळट भोळसट देवभोळे अज्ञानी असे समजून, वाईट विघातक क्रूर अमानुष कृत्य करतात. की ते केल्याने त्यानां फायदा होतो, हेतू एक त्यान्च्या पुढे कोणी जाऊ नये. आपल्या शिवाय कोणाला चांगले म्हणू नये, समाजाला चांगली दिशा मिळू नये. योग्य मार्गदर्शन मिळू नये, समाज सुधारू नये, कारण असे झाल्याने या लोकांचे वर्चस्व धोक्यात येते. लोकं घाबरत नाही, मग या चांगल्या माणसांमुळे आपल्याला आपली संधी साधू वृत्ती पिढ्यानपिढ्या जोपासता येणार नाही. आणि म्हणून असे लोकं चांगल्या माणसांच्या जीवनात मीठाचा खडा टाकतात. व स्वता नामानीराळे रहातात, फक्त अशा लोकांना ओळखण्याची गरज आहे. व स्वताला सक्षम बनवण्याची, पण चांगल्या माणसांनी अजिबात घाबरून आपला पवित्रा बदलू नये. कारण हेच या लोकांना हवं असतं, या जगात चांगल्या माणसाचं फक्त नाव होतं पुतळे बनतात, जयंती साजरी होती. पण त्यानां जिवंत पणी न्याय मिळतं नाही, हा इतिहास आहे. पण हे झाले येथून मागचे, आता खरी गरज आहे ते चांगल्या माणसाचीच, व एकजुटीची. कारण काळ बदलत चाललाय, स्वार्थी माणसं सोकावत चाललीय, त्यानां आणखी खतपाणी घालण्यापेक्षा, चांगल्या बि्याणा ची गरज आहे. या मातीला म्हणजे सोनं उगवलं व चमकलं ते चांगल्या माणसांची रास होऊन च. तेव्हा जो चांगला तो कायम चमकतं रहातो. थोडा उशीर लागतो, पण खरच योग्यता दर्शवतो. हे फक्त माझे मत आहे पण पटलं तर बघा. मला उम्मीद आहे की हे वीडियो तुम्हाला आवडले असेल, आवडले असेल तर वीडियो ला like आणि चैनल ला सब्स्क्राइब जरूर करा। तुमच्या एक like ने आम्हाला प्रेरणा मिळते, व ऐसे वीडियो बनवण्यास आम्ही मोटिवेट होतोत। धन्यवाद ।

Comments
Post a Comment