कर्माची फळे कसे मिळतात
नमस्कार दर्शकों, तुमचे सर्वांचे मराठी क्लब channel मधे स्वागत आहे. जीवना मधे येऊन माणसाने काय केल पाहिजे, आणि काय नाही केल पाहिजे हे कळण खूप गरजेच आहे. जर हे माणसाला कळालतर, गीता कळाली अस मानायला हरकत नाही. कुठल कर्म केल्याने काय होत आणि काय होत नाही, हे समजन खूप गरजेच आहे. तर मित्रांनो, हे छोटस video आपल्याला खूप काही शिकवून जाईल. तर video लास्ट परेंत जरूर एका, आणि खऱ्या मनाने कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा. भगवत गीते मधे विस प्रकार ची कर्म आणि त्याचे फळ सांगितले आहेत। भगवद्गीतेतील एक श्लोक फार सुप्रसिद्ध आहे, कारण त्यात निष्काम कर्माचा सिद्धान्त सांगितलेला आहे। कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा, ते संङ्गोsस्त्वकर्मणि। ह्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण युद्ध करायला तयार नसलेल्या अर्जुनाला सांगतात, की तुला केवळ तुझे नियत कर्म करण्याचा अधिकार आहे, पण कर्माच्या फळावर मात्र तुझा काही अधिकार नाही। तुझ्या कर्माच्या फळास तूच कारणीभूत आहेस, असे कधीही समजू नकोस। तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस। सामान्य माणसासाठी ह्या श्लोकात बोध हा आहे की, माणसाने कोणतेही कर्म फळाची आशा बाळगून करणे बरोबर नाही। जे काही त्याचे कर्तव्य असेल तेवढे फक्त त्याने पाळायचे। निष्काम कर्म म्हणजे, फळाची अपेक्षा न धरता काम करत राहणे, आणि पुढे जे होणार असेल तेच होईल असे समजून, त्यात समाधान मानणे। मोक्षप्राप्तीसाठी फक्त निष्काम कर्म गणले जाते, सकाम कर्म नाही। येथे प्रश्न हा उद्भवतो की, माणसाचे कर्तव्य काय आहे हे मुळात कोण ठरवते, आणि त्याला ते कसे कळते? आणि माणूस मुळातच कोणताही प्रयत्न कशासाठी करतो? काही तरी साध्य करण्यासाठीच ना? आजच्या काळात असा कोणता विद्यार्थी सापडेल, जो परीक्षेला बसतो पण उत्तीर्ण व्हायची त्याच्या मनात इच्छाच नसते? अथवा असा कोणी उद्योजक मिळेल का, जो त्याच्या उद्योगात मोठी गुंतवणूक करतो, पण भविष्यात त्याला नफा हेईल की तोटा ह्याचा विचार तो करीत नाही? अशा प्रकारची उदासीन किंवा काहीशी नकारात्मक वृत्ती धारण करणे हिताचे नाही। उलट माणसाने जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहिले पाहिजे। मागा, आणि ते तुम्हाला दिले जाईल, शोधा, आणि तुम्हाला सापडेल, ठोका, आणि तुमच्यासाठी उघडले जाईल। कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते, आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल। आणि असेही की, लोकांनी तुमच्याशी सर्व गोष्टींत कसे वागावे, अशी तुमची इच्छा असेल तसे तुम्ही त्यांच्याशी वागा। मागणे, शोधणे किंवा दार ठोकणे हा प्रयत्नशील माणसाच्या दैनंदिन जीवनक्रमाचा एक भाग आहे। जर कोणी प्रयत्नच केला नाही, तर त्याला काही साध्य होणार नाही हे तर नक्की। त्याचप्रमाणे कोणी उद्दिष्ट समोर ठेवून जर प्रयत्न केला, तर त्याला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। इतरांसाठी आपण काही काम केले, तर त्यात आपला काही स्वार्थ साधण्याचा हेतू कधीच नसावा, हे बरोबर आहे। पण श्री कृष्णाच सांगणे हे होते की, आपण जसे इतरांबरोबर वागू, तसेच तेही आपल्याबरोबर वागतील। म्हणून लोकांनी आपल्याशी चांगले वागावे, अशी जर आपली अपेक्षा असेल, तर आपण आधी त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे। न्याय करू नका, आणि तुमचा न्याय केला जाणार नाही। दोषी ठरवू नका, आणि तुम्हाला दोषी ठरवले जाणार नाही। क्षमा करा, आणि तुम्हाला क्षमा केली जाईल। द्या आणि तुम्हाला दिले जाईल। दाबून, हलवून, शीग भरून तुमच्या पदरात घालतील। कारण तुम्ही ज्या मापाने मोजून द्याल, त्यानेच तुम्हाला परत मोजून दिले जाईल। प्रयत्नांचे फळ मिळतेच मिळते.,कारण ते फळ देणारा आपला देवपिता आहे, जो सगळ्यांच्या गरजा जाणतो आणि पुरवतो। भगवंत म्हणतात, माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्मफळ माणसाच्या हातात नाही। कर्मफळाची आशा न ठेवता, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे। भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच। बहुतांना असे वाटते, हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो। पण हे खरे नाही। आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर, त्याचे फळ मिळायलाच पाहिजे, हेच योग्य आणि न्यायपूर्ण। जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर, कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच। मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात। उत्तम अभ्यास, उत्तम गुण सहज सोपी नियम आहे। पण नेहमीच असे होत नाही। कुणी विद्यार्थी आजारी पडतो, आणि पेपर देऊ शकत नाही। कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला नाही। कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे, नव्वद च्या जागी नउ मार्क मिळतात। तो चक्क नापास होतो। एसएससी चा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात दोन तीन परीक्षार्थी केवळ टाईपरायटर खराब झाल्या मुळे अयशस्वी होतात। त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही। त्यांची तैयारी व्यर्थ जाते। शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो, खत, पाणी व मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते। त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही। वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले, पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही। कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसते। देश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो। समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव टाकणार्या इतर बाबींचे वर्णन, अध्यात्मिक ताप देह, इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप, शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी। आणि आधिभौतिक ताप, सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात, अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे. अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी। या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे। कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो। आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात। किंवा लोक कर्म करणे सोडून देतात। मृत्युलोकाला कर्मलोक ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही। कर्म हे करावेच लागणार, त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही। म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे। असे कर्म केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही, आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही। कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही। आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल। विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल। हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल। कसं आहे ना साध गाजर गवताच बीज जरी जमीनीवर पडल, तरी त्याचं झाड व्हायला किमान एक महिना तर लागतोचना। तेही बिनकामाच एक महिना घेत। मग हे तर आपल कर्म आहे, तेही पृथ्वीवरच्या सर्वात श्रेष्ठ मानव प्राण्याच। आंब्याच बीज लावलं तर फळ यायला किमान पाच वर्ष लागतात, गावरान आंब्याची म्हणतो मी संकरीत नाही, ना चव ना सूगंध। आता राहीला प्रश्न मानवाच्या कर्माचा, तर त्याच्या कर्माचा फारच व्यापक असर स्वतावर आणि इतरांवर पडत असतो। अहो एक शब्द जरी चुकीचा बोललो तर काय होईल ते सांगता येत नाही, मग हे तर अख्ख कर्म आहे। आणि ते जर जिवनात पेरल, तर फळ लगेच कसे काय मिळेल? मोठया आशेने एखादा कुत्रा इथे काहीतरी मिळेल म्हणून आपल्या दाराशी येतो। आपल लक्ष नसते, आपण सहज दार आड करतो। पण त्या उपाशी कुत्र्यावर काय बितली असेल। आता दार आड करणे हे अगदी साधं आणि छोटसं कर्म आहे, परंतू परिणाम खुप मोठे आहेत ? आणि त्याच जागी एखादा मदत मागायला माणूस असेल तर, त्याच्यावर काय बितेल। दार आड करणे हे एकच कर्म, परंतू त्याचे परिणाम प्रसंगानूरूप वेगळी वेगळी मिलतात। हे झाल एक छोट कर्म, मोठ कर्म असेल तर, चांगलं किंवा वाईट। पारिणामही तेवढेच मोठे, आणि त्याला लागणारा वेळ ही तेवढाच मोठा। कर्मावर आधारीत भगवत गीता मधे सांगितल आहे, उर्ध्वमूलमधः शाखमं। म्हणजेच वडाच्या झाडाच्या फांदया वरवर जातात, त्याच उलट, झाडाची मूळ अगदी खोल खोल जातात। ती मूळं शोधणं कठीण आहे, त्याचप्रमाणे अगदी खोल खोल गेलेली मागच्या जन्मातील कर्म शोधने कठीण ही कठिन आहे। परंतू फांदयाप्रमाणे कर्माची फळं वरवर येत राहतात, म्हणजे आपल्या चालू जिवनातही येऊ शकतात। मग एखाद बाळ अमेरीकेच्या आलिशान बंगल्यात कस काय जन्माला येत, नी एखाद बाळ आफ्रीकेच्या घनदाट जंगलात एखाद्या झोपडीत कसं काय जन्माला येत? बोले तो पिछले जन्मकी आहट जरूर सूनाई देती है, सिर्फ सूननेवाला चाहिए। मला खात्री आहे की हे वीडियो तुम्हाला आवडले असेल, आवडले असेल तर वीडियो ला like आणि चैनल ला सब्स्क्राइब जरूर करा। तुमच्या एक like ने आम्हाला प्रेरणा मिळते, व असे वीडियो बनवण्यास आम्ही मोटिवेट होतोत। धन्यवाद ।

Comments
Post a Comment