भगवत गीता सार मराठी - कर्माची फळे भोगावी लागतात
नमस्कार दर्शको आपले सर्वांचे स्वागत आहे। जो मनुष्य भगवत गीता ऐकतो व समजतो , अणि आपल्या जीवना मधे त्याच आचरण करतो, तो मनुष्य कधी ही दुखी आणि निराश होऊ शकत नाही। कर्माची फळ हे भोगवी लागतात की नाही, अणि कधी भोगवी लागतात। हे सर्व भगवत गीते मधे सखोल सांगितल आहे। प्रिय दर्शको, हे वीडियो ध्यान लाउन आणि शेवटी परेंत जरूर आइका। अणि मनापासून कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा। जीवन अनमोल हिरा, ज्यास कर्माने पैलू पडतो । तो सत्कर्माने उजळतो, आणि दुष्कर्माने सडतो । हे जीवन अनमोल, परंतु त्याहूनही कर्म अनमोल आहे. म्हणून कर्म करताना अत्यंत दक्ष असायला हवे. कर्म म्हणजे फक्त दैनंदिन जीवनातील व्यवहारिक कामच नव्हे, तर आपल्याकडून होणारी प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्म होय. आपले चालणे, बोलणे, पाहणे, ऐकणे, विचार करणे वगैरे प्रत्येक हालचाल ही कर्मातच येते. कर्माविना मनुष्य थांबुच शकत नाही. इच्छा असो की नसो आपल्याकडून कर्म घडतच राहतात. आणि ती कर्मे त्यांचा परिणाम आपल्याला भोगायला भाग पाडतातच !! म्हणून कर्म घडले की कर्मफळ समोर पडलेच म्हणून समजा. एखादे वेळी कर्मातून सुटका होईल, परंतु कर्मफळातून सुटका होणे अशक्य. सुखाने जगण्यासाठी आपण धडपडून कर्मे करतो, नाना खटपटी करतो, व ती जशी झाली तशीच कर्मगती आपणास लाभते. पण कर्म व कर्मफळाची गंमत अशी आहे, की आपण सुखासाठी कर्म करतो व कर्मफळ मात्र दुखमय मिळते. असे का होते ? मर्म असे आहे की, आपले कर्म आपल्या पेक्षा इतरांनाही सुखकारक झाले, तर कर्मफळ शतपट चांगले मिळते. पण आपण फक्त आपल्याच पुरता विचार करून कर्म केले तर, शुद्ध सुख मिळूच शकत नाही. उलट आपली कर्मे इतरांना त्रासदायक, दुखदायक ठरली तर त्याच्या शतपटीने दुख आपल्या वाट्याला नक्कीच येते. वाईट कर्माचा प्रारंभच तुम्हाला दुःखाच्या दरीत लोटतो. म्हणून यत्किंचितही इतरांना त्रास होणारे कसलेच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू नये! कर्मसिद्धांत इशारा देतो की,आपण दुसऱ्या बद्दल केवळ वाईट विचार जरी केला, तर त्याचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात! आणि इतरांबद्दल केलेली कणभर वाईट कृती आपल्याला शतपट वाईट फळे भोगायला भाग पाडते. हे जसे दुष्कर्म फळा बद्दल आहे,तद्ववतच, इतरांबद्दलचा एक चांगला विचार आपल्याला शतपट चांगले बनवितो. एक छोटे इतरांसाठी केलेले सत्कर्म आपल्याला शतपट चांगलेच फळ देते. द्रौपदीचे दुर्योधनास कुत्सितपणे क्षणिक हसणे किती भयंकर परिणामांचे कर्म झाले. आणि त्याच द्रौपदीने लहानपणी नदीवर अंध ऋषींना स्नान करताना, त्यांचे वस्त्र हरवले म्हणून स्वत जवळ चे एक वस्त्र दिले. द्रौपदीच्या संकट समयी त्या सत्कर्मामुळे अनंत वस्त्रे तिला मिळाली. म्हणून दक्षतेने सत्कर्म पाळावे, दक्षतेने दुष्कर्म टाळावे! यासाठी विचारपूर्वक कर्म करायला हवे. आपण आज अविचाराने वागलो तर लगेच नाही कर्मफळ दिसले, तरी उशिरा का होईना त्याची कर्मफळे पुढे वाट्याला येणारच!! उन्हाळ्यात रखरखीत जमिनीत पडलेली गवताची बीजे तेव्हां दिसत नाहीत, परंतु काही काळानंतर पाऊस पडला, की सारे गवत उगवून येते, व शतपटीने बीज प्रसार करते! कर्म गती ही गहन आहे. ती कुणीही चुकवू शकत नाही! धनवंतातील धनवान, सर्व सत्ताधीश व प्रचंड बलवानही कर्म गती टाळू शकत नाहीत!! नाना उपद्व्याप केले, अनंत खटपटी केल्या, तरी कर्मफळ बदलू शकत नाही. जगाचा इतिहास हा कर्म फळाचा इतिहास आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्ती त्याच्या कर्माचा परिपाक असते. सुखदुख हे त्या कर्माचे प्रतिध्वनी आहेत. म्हणून स्वतःच्या भल्यासाठी तरी कर्म विचारपूर्वक करा. गोष्ट कठोर आहे, पण कर्मगतीतून ईश्वराचीही सुटका होत नाही, भल्याभल्यांची होत नाही, मग आपल्या सारखे लहान क्षुद्र जीव कसे सुटतील? मग कर्म जाणून बुजून करा किंवा अजाणतेपणी करा, कर्म फळ भोगावेच लागते!! चुकून नकळत अजाणतेपणी विस्तवावर पाय पडला तर, विस्तव पोळतोच ना? अजाणतेपणाने विष शरीरात गेले तर मरणारच ना? म्हणतात ना, नकळत अमृत दुर्वा वर सांडले तर दुर्वा अमर झाल्या. राहू केतूने चोरून पिलेले अमृत कंठा पर्यंत असतानाच कंठ छेद झाले, तरी ते शिर अमर बनलेच ना? ध्रुवबाळ अजाणतेपणी तपाचरण करतो तर त्याला अढळपद मिळालेच ना? भक्त प्रल्हाद, अरुणी, उपमन्यु वगैरे लहान मुलांनी अजाणतेपणे भक्ती कर्म केले, तर त्यांना ईश्वरप्राप्ती झालीच ना? नवग्रह पालथे पडणाऱ्या रावणाचा काम धुंदीतील कर्मामुळे सर्वनाश झालाच ना? म्हणून असे घडत नाही की, अजाणतेपणी सत्कर्म वा दुष्कर्म केले तर त्याचे कर्मफळ मिळत नाही. कळत नकळत कसेही कर्म घडो त्याचे कर्म फळ मिळणारच! शिवलीलामृत ग्रंथात एक कथा आहे की, महाशिवरात्रीला शिकारीसाठी बेलाच्या झाडावर बसलेला पारधी नकळतच बेलाची पाने तोडून टाकीत असतो. ती खाली महादेवाच्या पिंडीवर पडतात. त्याच्या त्या अजाणतेपणात घडलेल्या सत्कर्मामुळे, त्याला मुक्ती मिळते!! तर अजाणतेपणाने चुकून राजा दशरथा कडून, अंधाऱ्या रात्री तळ्याकाठी श्रावण बाळास बाण लागून पुत्रवध घडतो. त्याचा भयंकर परिणाम, पुण्यश्लोक दशरथ राजास भोगावाच लागतो. अगदी ईश्वर अवतार पोटी जन्माला आला तरीही. म्हणून एक विनंती आहे, कर्म से डरिये, ईश्वर से नही । ईश्वर तो माफ कर सकता है, कर्म कभी नही. लोक विनोदाने म्हणतात, पण आपल्या भोवताली पाहिले तर सत्यता पटेल, की पूर्वी चित्रगुप्त मनुष्याची कर्म गती हाताने लिहून नोंदवित होता, म्हणून कर्मफळ पुढच्या जन्मी भोगावे लागत असे. परंतु आता चित्रगुप्त लॅपटॉप घेऊन, कर्मगतीची नोंद करतो म्हणून, कर्म फळे याच जन्मी भोगावी लागतात.
संत कबीर म्हणतात, पहिले करणे करे, बाद मे क्यूँ पछताये । पेढ बोया बबुल का, आम कहांसे खाये । खरंय ना? पटलं तर व्हय म्हणा, समजून घ्या, हसण्यावर न्हेऊ नका. केलेल्या कर्माची फळे यास जन्मात मिळतात की पुढील? ज्यांनी कर्म केले आहे, त्यालाच मिळतात की त्याचा प्रसाद इतरांनाही मिळतो? तुमच्या प्रश्नासाठी कर्मयोग थोडासा समजून घ्यायला लागेल. केलेल्या कर्माचे फळ अर्थातच मिळते, परंतु कर्ता आणि त्याची कर्म करण्यामागची प्रज्ञा, या दोन गोष्टी कर्माच्या फळावर परीणाम करतात. कर्मफलाच्या आसक्तीने केलेले कर्म, त्या कर्माचे फल कर्त्याला भोगायला लावते. तर अनासक्त कर्म कर्त्याला कर्मफलापासून मुक्त करते. अर्थात अनासक्त राहून कर्म करणे ही, साधनेने साध्य होणारी गोष्ट आहे. व्यक्तीच्या कर्माचे स्वरूप, कर्मामागची प्रज्ञा, आणि कर्माचा परीघ यावर फळ हे स्वतःला किंवा इतरांनाही भोगायला लागते, किंवा नाही हे ठरते. अर्जुनाचे युद्धकर्म हे केवळ अर्जुनच नव्हे, तर तत्कालिन आणि त्यानंतरच्या अनेक पीढ्यांना भोगायला लागले. सत्तेवर असणाऱ्या व्यक्तीच्या कर्माचा परीघ मोठा असतो, त्यामुळे त्याची बरीवाईट फळे भोगणाऱ्यांचाही परीघ मोठा असतो. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामुहिक फळे, कर्त्याच्या आणि कर्माच्या सत्व, रज, तमो गुणांवरुन फळाची रुपरेषा ठरवतात. कसं आहे ना, साधं गाजर गवताच बीज जरी जमीनीवर पडलं , तरी त्याचं झाड व्हायला किमान एक महिना तर लागतोचना. तेही बिनकामाच अन एक महिना घेतं. मग हे तर कर्म आहेत, तेही पृथ्वीवरच्या सर्वात श्रेष्ठ मानव प्राण्याची अन आंब्याच बीज लावलं तर, फळ यायला किमान पाच वर्ष लागतात, गावरान आंब्याची म्हणतो मी, संकरीत नाही ,ना चव ना सूगंध. आता राहीला प्रश्न मानवाच्या कर्माचा, तर त्याच्या कर्माचा फारच व्यापक असर स्वतःवर आणि इतरांवर पडत असतो. अहो एक शब्द जरी चुकीचा बोललो तर काय होईल ते सांगता येत नाही, मग हे तर अख्ख कर्म आहे. आणि ते जर जिवनात पेरलं तर, फळ लगेच कसे काय मिळेल? इन्स्टन्ट मोठया आशेने एखादा कुत्रा इथे काहीतरी मिळेल म्हणून आपल्या दाराशी येतो. आपलं लक्ष नसते, आपण सहज दार आड करतो, पण त्या उपाशी कुत्र्यावर काय बितली असेल. आता दार आड करणे हे अगदी साधं आणि छोटसं कर्म आहे, परंतू परिणाम? आणि त्याच जागी एखादा मदत मागायला माणूस असेल तर, त्याच्यावर काय बितेल. दार आड करणे हे एकच कर्म, परंतू त्याचे परिणाम प्रसंगानूरूप वेगळी वेगळी. हे झाल एक छोट कर्म. मोठ कर्म असेल तर, चांगलं किंवा वाईट पारिणामही तेवढेच मोठे, आणि त्याला लागणारा वेळ ही तेवढाच मोठा. कर्मावर आधारीत गीता श्लोक, उर्ध्वमूलमधः शाखमं. म्हणजेच वडाच्या झाडाच्या फांदया वरवर जातात, त्याच उलट झाडाची मूळं अगदी खोल खोल जातात. ती मूळं शोधणं कठीण, त्याचप्रमाणे अगदी खोल खोल गेलेली मागच्या जन्मातील कर्म शोधने कठीण. परंतू फांदयाप्रमाणे कर्माची फळं वरवर येत राहतात. म्हणजे आपल्या चालू जिवनातही येऊ शकतात. मग एखाद बाळ अमेरीकेच्या आलिशान बंगल्यात कसं काय जन्माला येत , नी एखाद बाळ आफ्रीकेच्या घनदाट जंगलात एखाद्या झोपडीत कसं काय जन्माला येत? बोले तो पिछले जन्मकी आहट जरूर सूनाई देती है, सिर्फ सूननेवाला हो. आपल्या चांगले कर्म परत आपल्याकडे येतेच येते, तसेच ज्याचे वाईट कर्म त्याच्याकडेच राहते. या गोष्टींवर माझा ठाम विश्वास आहे, व माझे वैयक्तिक अनेक स्वानुभव आहेत. त्यावर लिहीत बसलो तर कादंबरी होईल. पण मला स्वतःच्या चांगल्या कर्माचे उदाहरण, उदाहरणासाठी देणे उचित वाटत नाही. हे काम भगवंताचे आहे. एका जुन्या इमारतीत त्या वैद्याचे घर होते. घराच्या मागच्या भागात त्याने संसार थाटला होता, आणि पुढच्या भागात दवाखाना. त्याच्या पत्नीची सवय होती कि, दवाखाना उघडण्यापूर्वी संसाराला लागणारी, त्या दिवसाच्या सामानाची एक चिठ्ठी, ती दवाखान्यात ठेवत असे. पूजाअर्चा करून वैद्य महाराज दवाखान्यात येत, आणि भगवंताचे नाव घेऊन ती चिठ्ठी उघडत. पत्नीने ज्या गोष्टी त्यात लिहिल्या आहेत, त्यांच्यासमोर ते त्या वस्तूंचे भाव लिहीत असत, आणि त्याचा हिशेब करत असत. नंतर मग परमात्म्याची प्रार्थना करून म्हणत, हे दयाघना भगवंता, मी केवळ तुझ्याच आदेशानुसार, तुझी भक्ती सोडून, इथे या दुनियादारीच्या चक्रात येऊन बसलो आहे. वैद्यजी कधीच आपल्या तोंडाने रोग्याला फ़ी मागत नसत. कुणी द्यायचे तर कुणी नाही, परंतु एक बाब निश्चित होती, कि त्या दिवसाच्या सामानाचा लावलेल्या हिशेबाची रक्कम पूर्ण झाली की, नंतर आलेल्यांकडून ते काहीच फी घेत नसत. मग तो येणारा रोगी कितीही पात्र आणि श्रीमंत असो. एक दिवस वैद्याने दवाखाना उघडला. गादीवर बसून परमात्म्याचे स्मरण करून, पैशाचा हिशेब लावण्यासाठी चिठ्ठी उघडली, आणि ते अवाक झाले, एकटक बघतच राहिले. काही क्षण त्यांचे मन भरकटले, डोळ्यासमोर तारे चमकायला लागले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानी आपल्या मनावर नियंत्रण मिळवले. गव्हाचे पीठ, तेल तूप, मीठ, तांदूळ डाळ या सामानानंतर पत्नीने शेवटी लिहिले होते, मुलीचे लग्न येत्या २० तारखेला आहे, तिच्या लग्नाला, हुंड्याला लागणारे सामान. काही वेळ विचार करून, बाकी सगळ्या सामानांची किंमत लिहून, लग्नाला लागणाऱ्या सामानासमोर त्यांनी लिहिले, हे काम भगवंताचे आहे, तो जाणे आणि त्याचे काम जाणे. नेहेमीप्रमाणे काही रोगी आले, त्यांना वैद्यांनी औषधी दिली. या दरम्यान एक मोठीशी कार त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्यांनी काही खास लक्ष दिले नाही, कित्येक कार त्यांच्याकडे येत असत.
आधी आलेले रोगी औषधी घेऊन चालले, गेले. तो सूटा बुटातला साहेब कारमधून बाहेर आला, आणि नमस्कार म्हणत बेंचवर बसला. वैद्य म्हणाले, आपल्याला जर औषधी पाहिजे असेल तर आपण इकडे स्टूल वर या, म्हणजे मी आपली नाड़ी परीक्षा करू शकेन, आणि कुणा इतरांसाठी औषधी हवी असेल तर रोगाचे, स्थितीचे वर्णन करा. ते साहेब म्हणू लागले, वैद्यजी, तुम्ही मला ओळखले नाही का? माझे नाव कृष्णलाल आहे. आणि आपण तरी कसे ओळखणार, कारण मी १५ १६ वर्षानंतर आपल्याकडे आलो आहे. आपल्याला मी आपल्या मागच्या मुलाखतीबद्दल सांगतो, म्हणजे सारे काही समजून येईल. जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो ना, तेव्हा मी स्वतःहून आलो नव्हतो, खरे तर ती ईश्वरी योजनाच होती. ईश्वराला माझ्यावर कृपा करण्याची इच्छा झाली होती, कारण त्याला माझे घर आबाद करायचे होते, माझ्या जीवनात भरभरून सुख आणायचे होते. आणि आपली ती पहिली भेट आठवली की, आज देखील ईश्वराच्या त्या साहजिक कृपेच्या प्रसंग आठवणीने, मी विनम्र होतो, नतमस्तक होतो, नि:शब्द होतो. झाले असे होते की, मी आपल्या पाहुण्यांच्या घरी जात होतो. अगदी आपल्या दवाखान्याच्या समोर माझी कार पंक्चर झाली. ड्रायव्हर कारचे चाक काढून पंक्चर काढायला गेला. आपण बघितले की, मी उन्हामध्ये कारजवळ उभा आहे. आपण माझ्याजवळ आलात आणि दवाखान्याकडे बोट दाखवून आत यायला विनंती केली, इथे खुर्चीमध्ये सावलीत बस म्हणून म्हणालात. आंधळ्याला काय दोन डोळेच पाहिजे असतात, मी खुर्चीमध्ये येऊन बसलो. आपण मला यथोचित गूळ पाणी देऊन तृप्त केले. का कोण जाणे पण ड्रायव्हरने देखील काही जास्तच वेळ घेतला होता. दुपार झाली होती. एक छोटीशी मुलगी आपल्या गादीपाशी उभी होती, आणि म्हणत होती, चला ना बाबा, मला भूक लागली आहे. आपण तिला म्हणत होता, बाळा थोडा धीर धर, जाऊयातच आपण. मी हा विचार केला की इतक्या वेळचा आपल्याजवळ बसलो आहे, आणि माझ्यामुळे आपण जेवायला देखील जाऊ शकत नाहीत. म्हणून काहीतरी औषधी विकत घेऊन टाकू, म्हणजे माझ्या बसण्याचा भार हलका होईल, काही उद्देश प्राप्त होईल. मी आपल्याला बोलता बोलता म्हणालो, वैद्य महाराज, मागच्या ५ ६ वर्षांपासून मी इंग्लंडमध्ये राहतो, व्यवसाय करतो तिथे. इंग्लंडला जाण्यापूर्वीच माझे लग्न झाले आहे, पण संतती सुखापासून मात्र अजून वंचित आहे. इथे भारतात देखील बरेच इलाज केले, तिथे इंग्लंडमध्ये देखील दाखवले, पण पदरी निराशाच पडली आहे. आपण म्हणालात, भगवंतापासून निराश होऊ नका, तो अत्यंत दयाळू आहे, तो खूप मोठा दाता आहे. आपण म्हणालात, लक्षात ठेवा त्याच्या कोषागारात कशाचीही कमी नाही. कशाचीही आस तो पूर्ण करतो. संतती, धन दौलत, इज्जत, सुख दुख, जीवन मृत्यु, सारे काही त्याच्याच हातात आहे. ते कुणा वैद्य किंवा डॉक्टरच्या हातात नसते. ते कोणत्या औषधाने मिळत नाही. जे काही व्हायचे असते ते सारे भगवंताच्या आदेशाने होत असते. संतती जरी द्यायची असेल तरी दाता तोच आहे. आजदेखील तो प्रसंग जशाच्या तसाच माझ्या नजरेसमोर आहे. माझ्याशी हे सारे बोलत असताना, आपण एकीकडे औषधाच्या पुड्या बांधत होतात. सगळ्या औषधी आपण दोन भागात विभाजित करून, दोन वेगवेगळ्या पाकिटात टाकल्या, आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत. मी ताबडतोब ती औषधी घेतली. कारण त्याच्यामागे फक्त आपल्याला काही पैसे देणे हा उद्देश होता. परंतु आपण पैसे घेण्याला नकार दिला. बस, ठीक आहे म्हणालात. जेव्हा मी आग्रह केला तेव्हा आपण म्हणालात कि आजचे खाते बंद झाले आहे. मला काहीच समजले नाही. परंतु या दरम्यान आपल्याकडे एक व्यक्ती आला. त्याने आपली चर्चा ऐकून मला सांगितले कि आजचे खाते बंद झाले. म्हणजे वैद्य महाराजांना आजच्या दिवसाची घरेलू खर्चासाठी लागणारी राशी, जी त्यांनी भगवंताला मागितली होती, तेवढी भगवंताने त्यांना रोग्यांमार्फत दिली आहे. त्याशिवाय ते अधिक पैसे कुणाकडूनही घेत नाही. मी काहीसा परेशान झालो कारण मी माझ्या मनानेच लज्जित झालो. माझे विचार किती निम्न होते आणि हा सरलचित्त वैद्य किती महान आहे. मी जेव्हा घरी जाऊन पत्नीला औषधि दाखवली, आणि सारा प्रसंग तिच्यासमोर उभा केला, तेव्हा तिला भगवतदर्शनाचा आनंद झाला, तिच्या डोळ्यातून पाणी आले, मन भरून आले, आणि ती म्हणाली ते वैद्य म्हणजे कुणी व्यक्ती माणूस नसून माझ्यासाठी तो देवतारूप माध्यम बनून आला आहे. आजवर एवढी सारी औषधी घेतली, एवढे वैद्य, हकीम, डॉक्टर झाले, आज मला माझ्या मनीची इच्छा पूर्ण करणारा भगवंत या वैद्याच्या रूपाने, या औषधी स्वरूपाने भेटला आहे. हे औषध माझ्या संततीसुखाचे कारण आहे, आपण दोघेही श्रद्धेने हे औषध घेऊ यात. कृष्णलाल वैद्याला पुढे सांगू लागला, आज माझ्या घरी दोन फूल उमलले आहेत. आम्ही दोघे पति पत्नी हरघडीला आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. इतक्या वर्षात व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता कि स्वतः येऊन आपल्याला धन्यवादाचे दोन शब्द बोलावे म्हणून. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आहे आणि कार केवळ आणि मुद्दाम इथेच थांबवली आहे. वैद्यजी आमचा सारा परिवार इंग्लंडमध्ये सेटल झाला आहे. केवळ माझी एक विधवा बहीण आणि तिची मुलगी इथे भारतात असते. आमच्या त्या भाच्चीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला होणार आहे.
का कोण जाणे जेव्हा जेव्हा मी आपल्या भाच्चीसाठी काही सामान खरेदी केले, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली ती छोटीशी मुलगी यायची, आणि मग प्रत्येक सामान मी डबल खरेदी करायचो. मी आपल्या विचारांना, तत्वाला, मूल्यांना जाणत होतो, कि संभवतः आपण हे सामान न घेवोत, परंतु असे वाटत होते कि माझ्या सख्ख्या भाच्चीच्या बरोबर मला नेहमी जो चेहरा दिसत आहे, ती पण माझी भाच्चीच तर आहे. माझे तिच्याशी एक नाते त्या भगवंताने असे जोडले आहे, आणि म्हणून आपण त्या नात्याला नकार देणार नाही, कारण माझ्या भाच्चीबरोबर या भाच्चीचा भात भरण्याची माझी ज़िम्मेदारी त्याने मला दिली आहे. वैद्याचे डोळे आश्चर्याने उघडेच्या उघडेच राहिले, आणि सौम्य आवाजात म्हणाले, कृष्णलालजी, आपण जे काही म्हणत आहात ते मला काहीच समजेनासे झाले आहे, ईश्वराची काय माया आहे, हे त्याचे तोच जाणे. आपण माझ्या श्रीमती’च्या हाताने लिहिलेली हि चिठ्ठीबघा, असे म्हणून वैद्यांनी ती चिठ्ठी कृष्णलालजींना दिली. तिथे उपस्थित सारे ती चिठ्ठी बघून हैराण झाले, कारण लग्नाचे सामान याच्यासमोर लिहिले होते. हे काम परमेश्वराचे आहे, त्याचे तोच जाणे. कंपित आवाजात वैद्य म्हणतात, कृष्णलालजी, विश्वास करा की, आजपावेतो कधीही असं झाले नाही, कि पत्नीने चिठ्ठीवर आवश्यकता लिहिली आहे, आणि भगवंताने त्याची व्यवस्था केली नाही. आपण सांगितलेली संपूर्ण हकीकत ऐकून असे वाटते कि, भगवंताला माहित होते की, कोणत्या दिवशी माझी श्रीमती काय लिहिणार आहे. अन्यथा आपल्याकडून इतक्या दिवस आधीपासून या सामान खरेदीचा आरंभ परमात्म्याने कसा करवून घेतला असता? वाह रे भगवंता, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी खरंच हैराण आहे की, तो कसे आपले रंग दाखवतो आहे. चातकाची तहान किती | तृप्ति करूनि निववी क्षिती. वैद्यजी पुढे म्हणतात, जेव्हापासून मला समजू लागले, केवळ एकच पाठ मी वाचला आहे. सकाळी उठून तुझी भक्ती करण्यासाठी मी अजून जिवंत आहे म्हणून त्या परमात्म्याचे आभार मानायचे, संध्याकाळी आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्याचे आभार मानायचे, खाताना, झोपताना, श्वास घेताना, असा हरघडीला त्याचे स्मरण करायचे, त्याचे आभार मानायचे. दळिता कांडिता | तुज गाईन अनंता. न विसंबे क्षणभरी, तुझे नाम गा मुरारी. प्रिय दर्शको, हे वीडियो ध्यान लाउन आणि शेवटी परेंत जरूर आइका। अणि मनापासून कमेंट मधे जय श्री कृष्ण जरूर लिहा। मला उम्मीद आहे की हे वीडियो तुम्हाला आवडले असेल, आवडले असेल तर वीडियो ला like आणि चैनल ला सब्स्क्राइब जरूर करा। तुमच्या एक like ने आम्हाला प्रेरणा मिळते, व ऐसे वीडियो बनवण्यास आम्ही मोटिवेट होतोत। धन्यवाद ।

Comments
Post a Comment